ओम प्रयास (हरिद्वार), 15 एप्रिल: उत्तराखंडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याने हरिद्वारमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान याप्रकरणी एकाला दोषी ठरवण्यात आले बलात्कार करून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा देण्यात आली. याचबरोबर दोषीला 62 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शिक्षा सुनावल्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. दोषीने आपल्या गर्भवती पत्नीची काळजी घेण्यासाठी अल्पवयीन मुलीला घरात आणले होते.
याप्रकरणी सरकारी वकील आदेश चंद चौहान म्हणाले की, 7 जानेवारी 2022 रोजी खानपूर परिसरात 17 वर्षीय मुलीवर हल्ला, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना समोर आली होती. ही घटना घडल्यानंतर पिडीतीने आपल्या कुटुंबियांना माहिती दिली.
3 वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज, पण लेस्बियन मैत्रिणीने केला कहर, अखेर तिने…
आरोपी इस्लामने जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले. तिच्यावर अन्याय होत असताना तिने विरोध केल्यानंतर इस्लामने तीला मारहाणही केली. यानंतर पीडितेच्या मावशीने पोलिसांत तक्रार देऊन इस्लामवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून कारागृहात पाठवले.
यावेळी अधिवक्ता आदेश चौहान म्हणाले की, या प्रकरणात सरकारच्या वतीने 7 साक्षीदार हजर झाले. दोषी इस्लामने अल्पवयीन मुलीला पत्नी गरोदर असताना तिची काळजी घेण्यासाठी घरी आणले होते. त्यांच्या पत्नीची रुग्णालयात प्रसूती झाली.
पत्नी बारमध्ये करायची काम, पतीचा संशय ठरला खरा अन्… ठाण्यातील धक्कादायक प्रकार
घटनेच्या दिवशी इस्लामच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याचाच गैरफायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा बळी बनवले. विशेष न्यायालयाने त्याला 20 वर्षांची शिक्षा आणि 62 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.