शिवम कुमार सिंग (भागलपूर), 18 मे : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. कित्येकवेळा लग्नात कोणत्याही कारणावरूर अनेक प्रकारचा गदारोळ होत असल्याचे चित्र पहायला मिळतं. असाच एक गोंधळ बिहारच्या भागलपूरमध्ये पाहायला मिळाला. नव दामप्त्य बोहल्यावर चढण्यापूर्वी एका मुलीने अचानक लग्नास नकार दिला. यामुळे लग्न मंडपात मोठा गोंधळ उडाला होता. यानंतर मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु ती मान्य झाली नाही. मुलीने सांगितले की हा मुलगा माझ्या लायक नाही म्हणत लग्न न करण्यावर ठाम राहिली यामुळे सगळेच अचंबीत झाले होते.
बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात नवऱ्या मुलासह वाजत गाजत वधूच्या दारात मिरवणूक आली. दोघांना स्टेजवर बोलवताच अचानक मुलीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यादरम्यान प्राथमिक स्वरुपात मुलीच्या बहिणींनी तिची समजूत काढण्यास सुरुवात केली. परंतु ती तिच्या मतांवर ठाम राहिल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुलगा मिरवणूक घेऊन मुलीच्या दारात पोहोचला, तेव्हाच कोणीतरी मुलीला सांगितले की मुलाचे वय जास्त आहे. दरम्यान, जेव्हा मुलगा हार घालण्यासाठी मंचावर पोहोचला तेव्हा मुलीने त्याला हार घालण्यास स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली की तो मुलगा माझ्या लायक नाही. तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आणि काळा आहे.
या दरम्यान मुलीची सर्व बाजुनी समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.पण या सगळ्याचा काही उपयोग झाला नाही. मुलीने लग्नास स्पष्ट नकार दिला. ती स्टेजवरून खाली उतरली आणि तिच्या घरी गेली. जर माझ्यावर लग्न करण्याचा दबाव आला तर मी आत्महत्या करेन असा थेट इशारा या मुलीने दिला.
सर्वांनी वधूला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती मान्य झाली नाही. यादरम्यान मुलाचे वडीलही मुलीची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. सर्व तयारी पूर्ण झाल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितले. तत्काळ बैठकही झाली. परंतु यातून कोणताच मार्ग न निघाल्याने मुलाकडचे मुलीला न घेताच परत गेले. यावेळी वातावरण तणावपूर्ण होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.