आदित्य तिवारी (भोपाळ),14 मे : आजच्या युगात तंत्रज्ञानाशिवाय जगणे खूप कठीण झाले आहे. यामुळे रोबोट आपल्या जीवनाचा भाग बनत चालला आहे. आत्तापर्यंत रोबोटचा वापर अवकाशाच्या प्रवासात होत होता परंतु तोच रोबोट आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहे. दरम्यान याचेच एक उदाहरण मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये पहायला मिळालं.
या दोन रोबोटना पाहण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. या रोबोट्ससोबत सेल्फी काढणाऱ्या आणि बोलणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील एका मॉलमध्ये रोबो तिथे येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करत होता यामुळे रोबोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या रोबोला लोकांनी टेमी असे नाव दिले आहे.
ज्याने मॉलमध्ये येणाऱ्या लोकांना मार्ग दाखवण्यासोबतच अनेक गोष्टीत मदत केली. टेमीने लोकांशी फक्त संवाद साधला नाही तर डान्स करून लोकांचे मनोरंजनही केले. हा रोबोट इस्रायलमध्ये बनवण्यात आला आहे.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त ISER च्या सायन्स अँड सोसायटी सेंटरच्या माध्यमातून रोबोटिक्सचे प्रात्यक्षिक करण्यात आले. हे पाहण्यासाठी अनेकांनी प्रादेशिक विज्ञान केंद्रात गर्दी केली होती.
या रोबोटने अवघ्या 7 मिनिटांत डीबी मॉलमधील प्रत्येक दुकानाचे लोकेशन लक्षात ठेवले होते. आणि हा रोबो इस्रायल मधून आणला गेला आहे आणि त्याची खासियत म्हणजे हा रोबोट फक्त दोन मिनिटात तुमच्या घराचे संपूर्ण लोकेशन लक्षात ठेवतो. हा रोबोट फक्त 2 दिवसांसाठी भोपाळमध्ये आला आहे.त्याला कायमस्वरुपी आणण्यासाठी आमचे लवकर प्रयत्न सुरू असल्याचे व्यवस्थापणाने सांगितल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.