मुंबई, 15 मे : आयपीएल 2023 मध्ये 62 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातने हैदराबादचा पराभव केला. गुजरात टायटन्सने सनरायजर्स हैदराबादवर 34 धावांनी विजय मिळवला असून यासह गुजरातची आयपीएल 2023 च्या प्ले ऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम बनली आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना पारपडला. यात हैदराबादच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी फलंदाजीत गुजरातकडून शुभमन गिलने 101 तर साई सुदर्शनने 47 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. या सामन्यात शुभमन गिलने त्याच्या आयपीएल करिअरमधील पहिली सेंतुरी ठोकली. गुजरात टायटन्सने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 188 धावा केल्या. तर हैदराबादला विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले.
गुजरातने दिलेले विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये त्यांच्या 3 महत्वाच्या विकेट पडल्या. सनरायजर्स हैदराबादकडून हेन्रीचं क्लासेनने 64, मार्करमने 10, भुवनेश्वर कुमारने 27, धावा केल्या. परंतु अखेर हैदराबादची टीम विजयाचे आव्हान पूर्ण करू शकली नाही आणि त्यांचा पराभव झाला. यासह हैदराबादचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले असून हा संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरला आहे.
प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम :
गुजरात टायटन्सने अहमदाबादमध्ये सनरायजर्स हैदराबादचा पराभव करून आयपीएल 2023 च्या प्लेऑफ मध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे. गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 च्या पॉईंट टेबलमध्ये 9 सामने जिंकून 18 पॉईंट सह पहिले स्थान कायम ठेवले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.