मुंबई, 7 मे : आयपीएल 2023 मध्ये 51 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातच्या ऋध्दिमान साहाने तुफान फटकेबाजी करत संघासाठी तब्बल केवळ 43 चेंडूत 81 धावा ठोकल्या. त्याची ही कामगिरी पाहून आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याचे कौतुक केले.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार कृणाल पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. तेव्हा गुजरातकडून ऋद्धिमान साहा आणि शुभमन गिलची जोडी मैदानात उतरली. दोघांनी मैदानात तुफान फटकेबाजी करत संघासाठी तब्बल 142 धावांची पार्टनरशीप केली. तर ऋद्धिमान साहाने केवळ 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. ऋद्धिमानची ही खेळी पाहून विराट कोहली देखील त्याचा फॅन झाला. तसेच गुजरातचा वेगवान गोलंदाज राशिद खानने देखील या सामन्यात अप्रतिम कॅच घेतला.
विराट कोहली गुजरात विरुद्ध लखनऊ यांच्यातील सामना टीव्हीवर पाहात होता. त्याने ऋद्धिमान साहा आणि राशिद खान या दोघांचा फोटो ट्विट करत त्यांचे कौतुक केले. ऋद्धिमान साहाची खेळी पाहून विराटने “वा काय प्लेअर आहे” अशी प्रतिक्रिया दिली. तर राशिद खानने घेतलेला कॅच पाहून विराट कोहलीने “मी पाहिलेली सर्वोत्तम कॅच, ब्रिलिएंट राशिद” असे म्हंटले.
गुजरात टायटन्सने 56 धावांनी लखनऊ सुपर जाएंट्सचा पराभव केला. तसेच आयपीएल पॉईंट टेबलमधील आपले अव्वल स्थान कायम ठेवले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.