मुंबई, 6 एप्रिल : वकील गुणरत्न सदावर्ते यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. मागच्याच आठवड्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली होती. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाई विरोधात सदावर्ते यांनी हायकोर्टात दाद मागितली आहे.
वकील सुशील मंचरकर यांनी बार कौन्सिल यांच्याकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवर तीन वकिलांच्या समितीने तपासणी करून गुणरत्न सदावर्ते यांना दोन वर्ष कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाही. अशा स्वरूपाची कारवाई केलेली आहे. एकूणच गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षासाठी सनद रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. बार कौन्सिलच्या नियम सात नुसार गुणरत्न सदावर्ते यांनी उल्लंघन केलं होतं आणि त्यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
काय झालं कोर्टात?
गुणरत्न सदावर्ते यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला. सदावर्ते यांना निलंबना विरोधात बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले. तिथं न्याय न मिळाल्यास पुन्हा हायकोर्टात दाद मागण्याची मुभा कायम असल्याचे सांगितले. सदावर्ते यांची वकिलीची सनद शिस्तभंगाच्या कारवाई अंतर्गत दोन वर्षांकरता निलंबित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निर्णयाला सदावर्तेंकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. सदावर्तेंची याचिका सुनावणी योग्यच नसल्याचा महाराष्ट्र आणि गोवा बार कौंन्सिलचा हायकोर्टात दावा. निलंबनाची कारवाई पदाधिका-यांनी सूडबुद्धीनं केल्याचा आरोप सदावर्तेंनी हायकोर्टात केला. कारवाई करताना कायदेशीर प्रक्रियेचा वापर केला न गेल्याचंही सदावर्तेंनी म्हटलं. आजच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्याकडून सदावर्ते दांपत्याला कोर्टरूममधील शिस्त पाळण्याबाबत वारंवार समज. सदावर्ते यांची भाषा आक्रमक, आवाजही मोठा होता. न्यायमूर्ती पटेल यांनी 2 वेळा सदावर्ते यांना समज दिली. तुम्ही प्रेससमोर नाही तर कोर्टाला दाद मागितली आहे, याचं भान राखा, अशा कडस शब्दात कोर्टाने समज दिली.
वाचा – ‘सुषमा अंधारे, राखी सावंत दोघी बहिणी’ भाजप नेत्याची टीका, म्हणाले, दोघींच्यात..
सदावर्ते काय म्हणाले?
आर्टिकल 32 नुसार मला बाजू मांडायची कोर्टाने संधी दिली. आर्टिकल 35 नुसार बार अँड कौन्सिलनं माझी परवानगी नाकारली असली तरी आर्टिकल 32 नुसार मी बाजू मांडू शकतो. बार अँड कौन्सिल पुन्हा एकदा ही चौकशी करेल असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यांनी प्रोसिजर फॉलो केली नव्हती हे कोर्टासमोर स्पष्ट झालं. राम भजनला त्यांनी बीभत्स स्वरूपामध्ये कोर्टासमोर मांडलं हे पाप त्यांना महागात जाईल. या देशामध्ये राम भजन म्हणणं हा गुन्हा आहे का? मी कोर्टात डंके की चोट पे माझी बाजू मांडली. बार अँड कौन्सिलच्या निर्णयावर सहमत नसेल तर पुन्हा माझ्याकडे या असं कोर्टानं मला सांगितलं. कोर्टानं न्यायाचे दरवाजे माझ्यासाठी उघडे ठेवले आहे. बार अँड कौन्सिलमध्ये शरद पवार समर्थक असलेल्यांची भुतावळ असल्याचाही आरोप सदावर्ते यांनी केला. मोजक्या काही डोक्यांनी माझ्याविरुद्ध केलेले हे षडयंत्र असून हा गुणरत्न सदावर्ते सगळ्यांना पुरून उरणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.