मुंबई, 15 मे : पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकार बेकायदेशीर आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. या प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
‘हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यामुळे सरकारचे आदेश पाळू नये’ असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. या प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकार पोलिसांवर दबाव टाकत आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मी चिथावणीची भाषा केलेली नाही, सरकारच्या दबावाला घाबरणार नसल्याचही राऊत यावेळी म्हणाले आहेत.
तुमच्या शहरातून (मुंबई)
राऊतांचे सरकारला आव्हान
दरम्यान पुढे बोलताना राऊत यांनी म्हटलं आहे की, सरकारवर अद्यापही अपात्रतेची टांगती तलवार आहे. मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुका आत्ता घ्या, मात्र भाजपला या निवडणुका घ्यायच्या नाहीत, असं आव्हान देतानाच आमचा आजही ईव्हीएमला विरोध कायम असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.