नीलम कराळे, प्रतिनिधी
पुणे, 21 एप्रिल : गुरु ग्रह हा आपल्या स्वराशी असलेल्या मीन राशीमधून मंगळाची राशी असलेल्या मेष राशीमध्ये 22 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी प्रवेश करणार आहे. तसेच गुरुचा पुण्यकाळ पहाटे 3 वाजून 20 मिनिटे ते सकाळी 7 वाजून 24 मिनिटे असा असणार आहे. त्यामुळे कोणत्या राशीला गुरू महाराज कितवा असेल आणि कोणत्या राशीला कोणते फळ मिळेल याबाबतची माहिती पुण्यातील ज्योतिषाचार्य जितेंद्र गलांडे यांनी दिली आहे.
कोणत्या राशीला गुरू कितवा असेल
तुमच्या शहरातून (पुणे)
गुरु महाराज मेषेला पहिले, मीन राशीला दुसरे, कुंभ राशीला तिसरे, मकर राशीला चौथे, धनु राशीला पाचवे, वृश्चिक राशीला सहावे, तूळ राशीला सातवे, कन्या राशीला आठवे, सिंह राशीला नववे, कर्क राशीला दहावे, मिथुन राशीला अकरावे आणि वृषभ राशीला बारावे असणार आहेत. याप्रमाणे प्रत्येक राशीला गुरुची विविध फळे प्राप्त होतील.
गुरु कोणत्या राशीला कोणत्या पदाने येणार
1) सुवर्ण पद – वृषभ, कर्क, धनु या राशींना सुवर्णपदाने गुरु असल्यामुळे या पदाचे फळ हे चिंता असून एका वर्षभरामध्ये या नागरिकांना कोणते ना कोणते चिंता सतावत राहील.
2) रौप्य पद – मेष, कन्या, मकर या राशींना गुरु हा रौप्य पदाने आलेला आहे. याचे फळ या राशीला शुभ मिळणार असून वर्षभरामध्ये या राशींना चांगली फळे गुरुमुळे मिळणार आहे.
3) ताम्र पद – सिंह, वृश्चिक, आणि मीन या राशींना ताम्रपदाने गुरु महाराज फळ देणार असून याचे फळ हे मिश्र असून त्यांना चांगल्या वाईट दोन्हीही फळांचा अनुभव या वर्षभराच्या कालावधीमध्ये मिळणार आहे.
4) लोह पद- मिथुन, तूळ, कुंभ या राशींना गुरू महाराज लोह पदाने आलेले असून यांना कष्ट हे फळ मिळणार असून यांना वर्षभरामध्ये गुरु महाराजांच्या कडून कष्ट फळ मिळणार असून यामध्ये त्यांना वर्षभर कष्टामध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल.
Akshay Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला कधी खरेदी करावं सोनं? पाहा पूजेचा आणि खरेदीचा मुहूर्त Video
जप या कार्यामध्ये करणे चांगले
अशाप्रकारे वर्षभरामध्ये गुरु विविध फळ देणार असून यामध्ये ज्या राशींना कष्ट आणि चिंता ही 12 महिने फळ मिळणार आहे. राशींनी या कालावधीमध्ये दत्तगुरु महाराज यांचा जप करावा तसेच या कालावधीमध्ये रोज चिमूटभर हळद पाण्यात टाकून आंघोळ करावी. तसेच दत्तगुरुंना प्रिय असलेल्या पिवळ्या वस्तुंचे यावेळेस दान केल्याने त्यांच्या चिंता आणि कष्ट कमी होण्यास मदत मिळेल. ओम द्राम दत्तात्रेय नमः या मंत्राचा देखील आपण या वेळेस जप करू शकता. तसेच गुरुच्या विविध मंत्राचा जप या कार्यामध्ये करणे चांगले असते,असं जितेंद्र गलांडे सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.