मद्रिद, 15 एप्रिल : स्पेनची ५० वर्षीय एथलीट बेअट्रिज फ्लेमिनी शुक्रवारी दीड वर्षानंतर गुहेतून बाहेर आली. गिर्यारोहक असणारी फ्लेमिनी तब्बल ५०० दिवस गुहेत एकटी राहिला. बाहेरच्या जगाशी तिचा आजिबात संपर्क नव्हता. ग्रनाडाच्या बाहेर असणाऱ्या गुहेत ती इतके दिवस राहिली. फ्लेमिनी २० नोव्हेंबर २०२१ रोजी गुहेत गेली होती. त्यावेळी युक्रेन-रशिया युद्धाला सुरुवात झाली होती. स्पेनमध्ये कोरोनामुळे सुरु असलेली मास्क सक्ती उठवण्यात आली होती.
दीड वर्षे गुहेत व्यतीत करणारी फ्लेमिनी म्हणते की ‘मी अजूनही २०-२१ नोव्हेंबरमधेच अडकले आहे. मला बाहेरच्या जगाबद्दल काहीच माहिती नाहीय. ‘ काही सायकॉलॉजिस्ट, रिसर्चर आणि स्पीलियोलॉजिस्टनी एकत्र येत एक संशोधन केलं. त्याच्या माध्यमातून संशोधकांना जाणून घ्यायचं होतं की, मानवी शरीर आणि मेंदुची क्षमता किती आहे. या शोधातून कुणीच नसलेल्या ठिकाणी राहिल्यानंतर मानवाच्या शरीरात आणि त्याच्या वागण्या-बोलण्यात काय फरक पडतो हे जाणून घेण्यात आलं.
जपानच्या पंतप्रधानांवर हल्ला, भाषण सुरू असतानाच झाला स्फोट; VIDEO व्हायरल
दक्षिण स्पेनमध्ये गुहेतून बाहेर आल्यानंतर तीव्र प्रकाशापासून वाचण्यासाठी बेअट्रिज फ्लेमिनीने काळा चष्मा घातला होता. यावेळी बोलताना ती म्हणाली की, मला बाहेर यायची इच्छा नव्हती. ते माझ्याकडे आले तेव्हा मी झोपले होते. मला वाटलं काहीतरी झालं असावं. मी माझं पुस्तकही वाचून संपवलं नाहीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.