महेश तिवारी, प्रतिनिधी
दंतेवाडा, 27 एप्रिल : छत्तीसगडमघ्ये बुधवारी झालेल्या भीषण नक्षलवादी हल्ल्याची जबाबदारी नक्षलवाद्यांच्या दरभा विभागीय संघटनेचा सचिव साईनाथने स्वीकारली आहे. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचं पत्र साईनाथने काढलं आहे. नक्षलवाद्यांच्या पीएलजीए म्हणजेच पीपल्स गुरील्ला आर्मीने हा हल्ला आपण केल्याचं मान्य केलं आहे. अरणपूरच्या हल्ल्याला सुरक्षा दलांकडून होत असलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर असल्याचं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
छत्तीसगडमध्ये झालेल्या या हल्ल्याचा घटनेदरम्यानचा व्हिडिओ समोर आला आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले होते. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटानंतर लगेच जवानांवर गोळीबारही केला गेला. मागून आलेल्या दुसऱ्या वाहनातील जवानांनी गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं. या व्हिडिओमधून घटनास्थळावर गोळीबाराचा भीषण आवाजही ऐकू येत आहे.
दंतेवाडातल्या नक्षलवादी हल्ल्यात 11 जवान शहीद, घटनास्थळावर स्फोट आणि गोळीबाराचा भीषण आवाज, Video#NaxalAttack pic.twitter.com/ZmjwRNKdlm
— News18Lokmat (@News18lokmat) April 27, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.