नवी दिल्ली : वाडिया ग्रुपच्या मालकीच्या गो फर्स्ट एअरलाईनने आर्थिक संकटामुळे 3 ते 5 मे या तीन दिवसांसाठी त्यांची सर्व उड्डाणं स्थगित केली आहेत. ही कंपनी दिवाळखोरीच्या स्थितीत पोहोचली आहे. कंपनीने एनसीएलटीमध्ये व्हॉलेंट्री इनसॉल्व्हन्सी प्रोसिडिंगसाठी अर्ज केलाय.
कंपनीने त्यांच्याकडे इंधन व पैसा नसल्याचं म्हटलंय. इंधन कंपन्यांचं थकित बिलही चुकवता येत नाहीये, असं म्हणत त्यांनी तीन दिवस उड्डाणं रद्द करण्याची घोषणा केली आहे. ‘नवभारत टाइम्स’ने याबद्दल वृत्त दिलंय.
Go First: खिशाला परवडणारी सेवा देणाऱ्या एअरलाईनचं दिवाळं? 5 मेपर्यंत विमान सेवा बंद
गो फर्स्ट दिवाळखोर का झाली?
गो फर्स्ट एअरलाइनने या परिस्थितीसाठी अमेरिकन इंजिन कंपनीला जबाबदार धरलं आहे. एअरलाइन्सने सांगितलं की त्यांच्या एकूण विमानांपैकी 50 टक्के विमानांनी उड्डाणच केलं नाही, कारण प्रॅट अँड व्हिटनी या अमेरिकन फर्मकडून त्यांनी मागवलेली इंजिनं त्यांना मिळाली नाहीत.
तसंच काही विमानांच्या इंजिनांमध्ये बिघाडही झाला. अमेरिकेतील Pratt & Whitney’s International Aero Engines कडून इंजिन पुरवठ्यामध्ये समस्या येत आहेत.
AC चालवल्याने कारच्या पेट्रोलचा खर्च कितीने वाढतो? 1 तासात एसीला किती पेट्रोल लागते? घ्या जाणून
एअरलाइनने सांगितलं की इंजिन कंपनी P&W ला 27 एप्रिल 2023 पर्यंत किमान 10 स्पेअर लीज्ड इंजिनं व आणखी 10 इंजिनं देण्यास सांगितलं होतं, परंतु, त्यांनी ऑर्डरचे पालन केलं नाही. ज्याचा त्यांच्या कमाईवर परिणाम झाला. विमानं उडू शकली नाहीत. कंपनीने पाठवलेल्या इंजिनमध्ये बिघाड वाढतच होता, परिणामी त्यांच्यावर उड्डाणं थांबवण्याची वेळ आली आहे.
कंपनीकडून मिळणारे सदोष इंजिन आणि वेळेवर पुरवठा न झाल्यामुळे गो फर्स्टची 50 टक्के विमानं उड्डाण करू शकली नाहीत, परिणामी त्यांचं मोठं नुकसान झालं. परिस्थितीबाबत कंपनीने सांगितले की, P&W विमान इंजिन दुरुस्त करण्यात आणि पार्ट्स पुरवण्यात अपयशी ठरले. त्यामुळे त्यांची विमानसेवा विस्कळीत होत राहिली व कामकाजाचा खर्च वाढतच गेला.
इतर कारणं
– या कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये वारंवार होणारे बदलही कंपनीच्या वाईट स्थितीला कारणीभूत आहेत.
– कंपनीकडे निधीची कमतरता होती.
– गेल्या काही महिन्यांपासून गोफर्स्टचे अर्धेच विमान ग्राउंडवर होते.
– प्रॅट आणि व्हिटनीकडून इंजिनचा पुरवठा खंडित होत राहिला.
– गोफर्स्टकडे 61 विमानं आहेत, तर इंडिगोकडे 310 विमानं आहेत.
गो फर्स्टला नोटीस
दरम्यान, DGCA ने GoFirst ला एअरलाइन थांबवण्याबाबत नोटीस पाठवून 24 तासांच्या आत उत्तर मागितलंय. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, ‘विमान कंपनी वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
गो फर्स्ट इंजिन पुरवठ्याशी संबंधित समस्यांना तोंड देत आहे. या प्रकरणी सरकार विमान कंपनीला सर्वतोपरी मदत करत आहे.’ दुसरीकडे, P&W ने इंजिन पुरवठा पूर्ण केल्यास एअरलाइन ऑगस्ट-सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण ऑपरेशन्सवर परत येईल, असं गो फर्स्टचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.