मुंबई, 4 मे : आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपर जाएंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर यांच्यात मैदानावर झालेला वाद शांत झाला असला तरी सोशल मीडियावर अजूनही यांच्यातील वादाचीच चर्चा सुरु आहे. काल चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यातील सामन्यात गौतम गंभीरला पाहताच विराट कोहलीच्या चाहत्यांनी घोषणा दयायला सुरुवात केली. ज्यावर गंभीरने दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएल 2023 मध्ये 45 वा सामना उत्तर प्रदेशातील एकना स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. सुरुवातीला टॉस जिंकून चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीने
प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या लाखनऊच्या संघाला चेन्नईच्या गोलंदाजांनी नाकीनऊ आणले. चेन्नईने 19.2 ओव्हरमध्ये पंजाबच्या 7 विकेट्स घेतल्या तेव्हा पंजाबची धावसंख्या 125 इतकी झाली होती, परंतु अचानक पाऊस सुरु झाल्याने सामन्यातील एकही डाव पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे सामना अनिर्णित ठरून दोन्ही संघांना एक एक पॉईंट्स देण्यात आले.
This is brutal ragging from the crowd. #LSGvsCSK #ViratKohli #GautamGambhir pic.twitter.com/q13QRBdKDS
— ESCN 18 (@EddyTweetzBro) May 4, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.