लखनऊ 19 मे : एका घराच्या उत्खननादरम्यान एक वीट आणि काही नाणी सापडल्याची चर्चा बाजारात आहे. कामगारांनी केलेल्या गोंधळामुळे हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं. हा प्रकार पाहून पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. यानंतर घरमालकाने उत्खननात सापडलेले नाणे पोलीस ठाण्यात जमा केले. मात्र, एक मजूर सोन्याची वीट घेऊन फरार झाल्याचीही चर्चा आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील औरेया जिल्ह्यातील आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मजूर एका पातेल्यात माती वाहून नेताना दिसत आहे. त्याने मातीच्या आत एक वीट लपवून ठेवल्याचं बोललं जात आहे.
दीपक यांच्या घरी बांधकाम सुरू आहे. जुनी भिंत पाडून माती खणताना मजुरांना एक वीट आणि काही नाणी मिळाली. ही वीट मुघलकालीन असल्याचं सांगण्यात येत आहे. काही लोकांनी वीट अष्टधातुची असल्याचं सांगितलं आहे. विटा आणि नाण्यांच्या मौल्यवानतेबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होऊ लागल्या. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर तपास करण्यात आला. कोतवालीचे प्रभारी पंकज मिश्रा यांनी सांगितलं की, उत्खननादरम्यान विटा आणि काही जुनी नाणी सापडली आहेत, जी दीपक यांनी पोलिसांत जमा केली आहेत.
स्वप्नात तुम्हाला पैसा दिसतोय? लवकरच अशा घडणाऱ्या घटनांचे संकेत असतात ते
ही वीट कोणत्या धातूची आहे, यासाठी पुरातत्व विभागाला पत्र दिले जाणार आहे. त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतरच वास्तव कळेल. 7 मे रोजी उत्खननादरम्यान अनमोल खजिन्यासारखं काहीतरी बाहेर आल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर ही माहिती पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना देणं घरमालकाने महत्त्वाचं समजलं नाही. ही बाब स्थानिक पातळीवरील लोकांच्या माध्यमातून चर्चेच्या केंद्रस्थानी आली. त्यानंतर औरैयामध्ये खजिना सोडल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या घराच्या उत्खननात आधी सोन्या-चांदीने भरलेले भांडे सापडले आणि काही दिवसांनी मजुरांना सोन्याची वीट सापडली. एक मजूर घर खोदत असताना त्याला सोन्याची वीट सापडली आणि तो सोन्याची वीट घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. सीसीटीव्ही फुटेजमध्येही हे चित्र दिसत आहे. तो मजूर डोक्यावर मातीने भरलेला ट्रे घेऊन जाताना दिसत आहे.
सध्या औरैया पोलिसांचे प्रभारी निरीक्षक पंकज मिश्रा यांनी सांगितलं की, जुनं नाणं घरमालक दीपकने पोलिसांत जमा केलं आहे. त्याच्या चौकशीसाठी पुरातत्व विभागाला पत्र लिहिण्यात येत आहे. पुरातत्व विभागाचे पथक त्याची चौकशी करेल, तेव्हा हा खजिना कोणत्या काळातील आहे, हे वास्तव समोर येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.