मुंबई, 22 मे: घरामध्ये वास्तुदोष असल्यास प्रत्येक कामात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगतीही थांबते. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी लोक विविध उपाय करतात. मोराच्या पिसांसंबंधी काही उपाय केल्यास घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतात. नवग्रह दोष असले तरी मोराच्या पिसांचं हे उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. चला जाणून घेऊया वास्तुच्या या उपायांबद्दल.
मोराच्या पिसांशी संबंधित वास्तु उपाय
पुराणानुसार, मोराचे पंख कोणत्याही ठिकाणाचे वाईट शक्ती आणि प्रतिकूल गोष्टींच्या प्रभावापासून संरक्षण करतात. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मोराचे पिसे खूप प्रभावी मानले जातात.
मोर धनाची देवी लक्ष्मी आणि विद्येची देवी सरस्वती यांच्याशी संबंधित आहे. जर घरातील सदस्यांची प्रगती थांबली असेल तर घरात मोराची पिसे जरूर ठेवा. याच्या शुभ प्रभावामुळे घरात धनाचे आगमन होऊ लागते.
वैवाहिक जीवनात तणाव असेल तर बेडरूममध्ये मोराची पिसे ठेवा. असे मानले जाते की यामुळे पती-पत्नीमधील संबंध सुधारतात आणि त्यांच्यातील प्रेम वाढते. मोराची पिसे ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
जर तुम्हाला शत्रूंपासून त्रास होत असेल तर मंगळवारी किंवा शनिवारी रात्री हनुमानजींच्या डोक्यावर सिंदूर लावून मोराच्या पिसावर त्या शत्रूचे नाव लिहा आणि घरातील पूजास्थानात ठेवा. सकाळी उठल्यावर हे मोरपंख वाहत्या पाण्यात सोडा. त्यामुळे शत्रू कमजोर होतो.
प्रेमात सहसा अयशस्वी होतात या राशी, रिलेशनशिपवरून कायम असतात संभ्रमात
कुंडलीतील चंद्राच्या अशुभ स्थितीपासून मुक्त होण्यासाठी मोराच्या पिसांसंबंधीचे उपाय खूप प्रभावी आहेत. यासाठी सोमवारी मोराची पिसे आणावीत, पिसाखाली पांढऱ्या रंगाचा धागा बांधावा. यानंतर पंखांसह आठ सुपारी ताटात ठेवा. गंगाजल शिंपडताना ‘ओम सोमय नमः जागरे स्थिराय स्वाहा’ या मंत्राचा 21 वेळा जप करा. असे केल्याने मानसिक शांती मिळते.
वास्तूनुसार मोराची पिसे घरात ठेवल्याने घरातील सर्व दोष दूर होतात. कुंडलीत नवग्रह दोष असल्यास घराच्या पूर्व आणि उत्तर-पश्चिम भिंतीवर मोराची पिसे लावावीत. यामुळे प्रत्येक ग्रहाचे दोष शांत होतात.
मेष राशीत चंद्राच्या प्रवेशाने तयार झाला चतुर्ग्रही योग, या राशींचे उजळणार भाग्य
जर तुम्ही ग्रहांच्या अशुभ प्रभावाने त्रस्त असाल तर ग्रहाच्या मंत्राचा 21 वेळा जप करून मोराच्या पिसांवर पाणी शिंपडा. आता ते जिथे दिसतील अशा ठिकाणी स्थापित करा.
घराच्या मुख्य दरवाजावर 3 मोराची पिसे लावून ‘ओम द्वारपालाय नम: जाग्रे स्थिराय स्वाहा’ हा मंत्र लिहून खाली गणेशाची मूर्ती ठेवा. यामुळे घरातील सदस्यांवर देवाची कृपा राहते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.