नवी दिल्ली 10 मे : एक व्यक्ती जबरदस्तीने आपल्या प्रेयसीच्या घरात घुसला. त्याने झोपलेल्या प्रेयसीच्या डोक्याचे केस कापले. एवढय़ावरही त्याचं समाधान झालं नाही, तर त्याने तोडफोड केली. कार, टीव्ही, खिडकी यांची तोडफोड केली. प्रेयसीने आपली फसवणूक केल्याचं त्याने सांगितलं. आता याप्रकरणी न्यायालयाचा निर्णय आला आहे. निकाल ऐकल्यानंतर त्या व्यक्तीने कोर्टाबाहेर प्रेयसीसमोर नाचायला सुरुवात केली. ही घटना ब्रिटनमधील नॉर्थम्प्टन येथील आहे.
मिरर यूकेच्या वृत्तानुसार, आपल्या प्रेयसीचा झोपेत असतानाच टक्कल करून तिच्या घराची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीचं नाव ओवेन जेम्स टायसो आहे. जेम्सने न्यायालयात सांगितलं की, त्याच्या प्रेयसीने त्याची फसवणूक केली होती, त्यामुळे त्याचा संयम सुटला. त्याने मुलीला शारीरिक इजा केली नाही. तो तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता.
सुनावणीनंतर नॉर्थम्प्टन क्राउन कोर्टातील न्यायाधीशांनी जेम्सला तुरुंगात पाठवलं नाही. त्याला सुधरण्याची संधी दिली आहे. मात्र, न्यायाधीशांनी कम्युनिटी ऑर्डर सुनावली आहे. या शिक्षेनुसार जेम्सला तुरुंगात जावे लागणार नसून कोर्टाने 12 महिन्यांसाठी घातलेल्या निर्बंधांचे पालन करावे लागेल. याशिवाय त्याला रिहॅब सेंटरमध्येही पाठवण्यात येणार आहे.
तसंच मुलीला 25 हजार रुपये नुकसानभरपाई आणि न्यायालयीन खर्च देण्याचे आदेशही न्यायालयाने जेम्सला दिले आहेत. या शिक्षेच्या घोषणेनंतर जेम्स फारसा दुःखी नव्हता. उलट तो कोर्टरूमच्या बाहेर प्रेयसीसमोर नाचू लागला. त्याचे फोटो सोशल मीडियावर आले आहेत.
या घटनेनंतर त्याने चांगली नोकरी गमावल्याचे जेम्सच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. त्याला पोलीस कोठडीत राहावे लागले. तो आधीपासून गुन्हेगार नाही. त्या दिवशी रागात त्याने हे सगळं केलं. त्याआधारे न्यायाधीशांनी जेम्सला तुरुंगात पाठवलं नाही. मात्र, त्यावर अनेक बंधने घालण्यात आली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.