नागपूर : नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अत्यंत किळसवाणी घटना समोर आली असून या प्रकरणी नगरपंचायतीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागरिकांना रक्त असलेलं पाणी मिळत असल्याची तक्रार देण्यात आली. ही धक्कादायक घटना नागपूरच्या महादूला परिसरात घडली आहे.
महादूला भागात पिण्याच्या पाण्यात कोंबड्यांचं रक्त आल्याचा दावा तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. पाणी भरण्यासाठी लावलं तेव्हा रक्ताच्या रंगाचं पाणी आलं, त्यामुळे खळबळ उडाली आणि गोंधळ सुरू झाला.
नागपुरातील धक्कादायक प्रकार, घरात नळाला आलं रक्ताचं पाणी#marathinews #nagpur #news18lokmat pic.twitter.com/LfatTk7CFs
— News18Lokmat (@News18lokmat) May 17, 2023
तुमच्या शहरातून (नागपूर)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.