मुंबई, 19 मे : हिंदू धर्मात कर्मकांडांनाही महत्त्व दिले जाते. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्ती आयुष्यभर वेगवेगळे विधी करत असते. हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या अंतिम संस्काराबाबत काही नियम परंपरेनुसार पाळले जातात. असे केल्याने मृत व्यक्तीचा आत्मा मुक्त होतो, असे मानले जाते. मृत्यू नंतरच्या विधी न पाळल्यास त्याचा आत्मा पृथ्वीवर फिरतो असे म्हणतात. अंत्यविधीच्या नंतर 10 व्या किंवा 12 व्या दिवशी केस कापण्याची परंपरा आहे. या मागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.
मृतांचा सन्मान करण्यासाठी-
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, कुटुंबातील व्यक्ती त्याच्याबद्दल श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्यासाठी मुंडण करतात. केसांशिवाय सौंदर्य नाही असं म्हणतात.
हानिकारक जीवाणू टाळण्यासाठी –
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, त्याच्या मृत्यूनंतर लगेचच त्याचे शरीर सडण्यास सुरुवात होते. त्यात हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात. या दरम्यान कुटुंबातील लोक घरापासून स्मशानभूमीपर्यंत अनेकदा मृतदेहाला स्पर्श करतात, त्यामुळे ते त्या हानिकारक जीवाणूंच्या संपर्कात येतात. ते बॅक्टेरियाही केसांना चिकटून राहतात. त्यामुळे केस काढले जातात, असं एक कारण सांगितलं जातं.
सूतक पूर्ण करण्यासाठी –
हिंदू धर्मानुसार, जेव्हा एखाद्या कुटुंबात मूल जन्माला येते तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर काही दिवस कुटुंबात विटाळ पाळला जातो. यावेळी कुटुंबातील लोकांना धार्मिक कार्यात सहभागी होता येत नाही. त्याचप्रमाणे कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यूनंतर कुटुंबात सूतक पाळले जाते, या काळात धार्मिक विधी करण्यास मनाई असते. केस कापल्यानंतरच सूतक पूर्णपणे संपते.
घरात पितृदोष असल्यास वेळ नका घालवू; अशुभ घडण्यापूर्वी हे उपाय करून घ्या
मृत व्यक्तीशी संपर्क होणार नाही –
गरुड पुराणात सांगितले आहे की, जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याचा आत्मा शरीर सोडण्यास तयार नसतो. यमराजाकडे याचना करून तो यमलोकातून परत येतो आणि आपल्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. शरीर नसल्यामुळे संपर्क साधण्यासाठी तो घरच्यांच्या केसांचा आधार घेतो, अशी एक धार्मिक मान्यता आहे.
अशी स्वप्नं पडणं शुभ संकेत असतात! देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनलाभ होण्याचे योग
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.