मुंबई, 11 एप्रिल : ‘चंद्रकांत पाटील हे ज्येष्ठ नेते आहे आणि आमचे सहकारी आहेत. पण त्यांच्या वक्तव्यांनी आम्ही सहमत नाही. वंदनीय बाळासाहेब तिथे नव्हते हे सांगणे योग्य नाही. चंद्रकांत पाटील यांनी माहिती घ्यायला हवी, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली.
बाबरी पाडण्यात आली तेव्हा तिथे शिवसैनिक नव्हते, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या याविधानामुळे वाद पेटला आहे. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला, तेव्हा शिवसैनिक तिथे होते. त्यावेळी बाळासाहेब, अडवाणींजी यांच्यावर गुन्हे झाले आहे. सर्वात आधी समर्थन करणारे बाळासाहेब ठाकरे हेच होते. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्यांशी आम्ही सहमत नाही. ९३ ची दंगल झाली ती बाळासाहेब यांच्यामुळे आटोक्यात आली. बाळासाहेब म्हणाले होते की, माझ्या शिवसैनिक यांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे, असं म्हणत उदय सामंत यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.
(Chandrakant Patil : बाबरी ढाचा पाडताना शिवसैनिक होते पण…; चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण)
‘मोदींनी अनेकवेळा बाळासाहेबांचा उल्लेख खूप आदराने केला आहे. त्यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त करतात. त्यामुळे दादांचे वक्तव्य म्हणजे भाजपचे नाही. मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील. भाजप म्हणून दादा हे बोलले नाही. आम्हाला बदनाम करणे हा त्यांच्या उद्देश नाही, असंही उदय सामंत म्हणाले.
(Uddhav Thackeray : तुम्ही कुणाला जोडे मारणार आता? उद्धव ठाकरेंची पाटलांच्या राजीनाम्याची मागणी)
‘सकाळपासून टीका टिप्पणी करणारे हे कुठेही नव्हते. दाऊदशी संबंध असणारे मंत्री जेलमध्ये तेव्हा त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे आता त्या लोकांना राजीनामा मागण्याच्या अधिकार नाही, असं म्हणत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, ‘बाळासाहेबांबाबत माझ्या मनात श्रद्धा आहे. त्यांच्या अनादराचं पाप आम्ही करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईतील हिंदू जिवंत आहेत. बाबरी ही हिंदूंनी पाडली आणि त्याचं नेतृत्व विश्व हिंदू परिषदेनं केलं होतं. कोणत्याही एका पक्षाने पाडला नाही’ असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, माझा थेट प्रश्न होता की संजय राऊत कुठे होते? बाळासाहेबांबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही. मुंबईत दंगली व्हायच्या तेव्हा जवळून बाळासाहेबांना पाहिलं. अयोध्येत बाबरी मशिद पाडताना शिवसैनिक होते की नव्हते. माझा प्रश्न संजय राऊत कुठे होते हा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.