गेल्या २९ वर्षापासून या बोली भाषेला उन्नत करण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे.राज्यातील चंद्रपूर,भंडारा, गडचिरोली,गोंदिया या जिल्ह्यात प्रामुख्याने ही भाषा बोलली जाते.
साहित्य संमेलनाचा हा प्रवास कुठल्याही राजकीय वा शासकीय मदती शिवाय १९९२ पासून निरंतर सुरू आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.विजय वडेट्टीवार साहेबांनी या संमेलनाला हजेरी लावत आपल्या मनोगतात सांगितले की ही भाषा मनाला भिडणारी आहे.पुण्यातील मराठी शुद्ध असेल तर आमची मराठी पिवर आहे असे गौरवद्गार काढले.
माणसं धर्म वा जातीने नाहीतर भाषेने जोडली जातात,आपली भाषा आपल्याला माय म्हणायला शिकवते,जिथे माय आहे तिथे कशाचीच कमी नाय आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावी यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न केले जात आहे,मी देखील राष्ट्रपती महोदयांना ३००० पत्र पाठवून तशी मागणी लावून धरली.मात्र हे सर्व करत असतांना येणाऱ्या काळात या बोली टिकल्या पाहिजे कारण त्याच भाषेला साज चढवणाऱ्या आहेत.