संतोषकुमार गुप्ता (छापरा), 06 मे : भाजपच्या बिहार राज्य कार्यकारिणीचे सदस्य विनोद सिंग सम्राट यांच्याकडून 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान ही धमकी तुरुंगात असलेल्या व्यक्तीने दिली आहे. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. याबाबत भाजप नेत्याने सोनपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. या माहितीवरून सोनपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
भाजप नेते सोनपूरमधील सबलपूर येथील हनुमान मंदिराचे अध्यक्ष आहेत. याशिवाय जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्षपदही त्यांच्या घरात आहे. यासोबतच ते क्रिकेट असोसिएशन आणि जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या उपाध्यक्षपदावरही आहेत.
देवदर्शनाहून परतताना कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांवर काळाचा घाला
भाजप नेते म्हणाले की, सोनपूर बरबट्टा येथे मित्राच्या ठिकाणी बसलो होतो. दरम्यान त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल आला. फोन करणार्याने आपण बेऊर कारागृहातून बोलत असल्याचे सांगितले. यावेळी त्याने 50 लाख खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याचबरोबर जर तुम्हाला राजकारण आणि व्यवसाय करायचा असेल तर रहार दियाराचे लोक तुमच्याशी संपर्क साधतील. त्याना 50 लाख रुपये द्या नाहीतर मरायला तयार राहा. धमकी देणाऱ्या व्यक्तीने असेही सांगितले की, तो बेऊर कारागृहात आहे, त्यानंतरही प्रशासन त्याचे नुकसान करू शकत नाही. असे सांगितल्यानंतर कॉल डिस्कनेक्ट केला.
सोनपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, प्राथमिक तपासात बेऊर कारागृहातून फोन केल्याची चर्चा खरी ठरली नसून हे प्रकरण इंटरनेट कॉलिंगचे असून, पोलिस तपास करत आहेत. बेऊर कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी तुरुंगातून खंडणी मागितल्याची चर्चा साफ फेटाळून लावली आहे.
ऑनलाइन गेममध्ये गमावले पैसे, तरुणाने तलावात उडी मारून संपवलं जीवन; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
मात्र, ज्या कैद्याच्या नावावर खंडणीची मागणी करण्यात आली आहे, त्याच्यावर नजर ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दुसरीकडे, एसपी गौरव मंगला यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.