तिरुवनंतपुरम 19 मे : आजकाल मोबाईल ही जणू प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अनिवार्य गोष्ट बनून गेली आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल वापरताना अगदी दंग होऊन गेल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. खरं तर या फोनने माणसाची अनेक कामं सोपी आणि सोयीस्कर केली. मात्र, फायद्यासोबतच याचे काही तोटेही आहेत, हे नक्की. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे.
वाह दीदी वाह! ‘पापा की परी’ स्कुटी पार्क करायला गेली, थेट दुकानात घुसली, Video
या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही खिशात मोबाईल ठेवण्याआधी दहावेळा विचार कराल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती चहाच्या दुकानात बसलेला आहे. तो अगदी निवांत बसलेला असतानाच अचानक त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलचा ब्लास्ट होतो. यानंतर मोबाईल आग पकडतो आणि या व्यक्तीच्या कपड्यांनाही आग लागते.
एक व्यक्ती चहाच्या दुकानात बसलेला असतानाच अचानक त्याच्या खिशातील मोबाईल फुटला आणि आग लागली. केरळमधील घटनेचा व्हिडिओ pic.twitter.com/eBrdeTQB2h
— News18Lokmat (@News18lokmat) May 19, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.