मुंबई, 8 मे- मागच्या काही दिवसांपासून मराठी सिनेमांना शो मिळत नसल्याचा मुद्द चर्चेत आहे. आता ह्याच मुद्दयाला हात घालत किरण माने यांनी एक पोस्ट केली आहे. किरण मानेची ही पोस्ट सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. किरण माने यांनी नुकताच तेंडल्या हा मराठी सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहून त्यांनी एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी मराठी सिनेमा, निर्माते, कलाकार यांच्यावर निशाणा साधला होता.
आत पुन्हा एकदा किरण माने यांनी मराठी सिनेमावर टीका केली आहे. तेंडल्या सिनेमा हा मातीशी नाळ घट्ट करणार सिनेमा आहे, एकादी कलाकृती चांगली होण्यासाठी पैसा नाही तर कला-कौशल्य असणं गरजेचं असतं. तसचं काही तेंडल्या सिनेमा आहे. बिग बजेट नाही का…कुणाती मदत नाही..केवळ कष्टाच्या जीवावर हा सिनेमा सर्वांसमोर आला आहे. यालाच धरून किरण माने यांनी ही पोस्ट केली आहे.
वाचा-आधी पती आणि मग तरुण मुलाला गमावलं; या गायिकेच्या वाट्याला आलं खूप दुःख
किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ” ‘तेंडल्या’ बघून आल्यानंतरबी मनात घर करून रहातो, तो त्यातला गजा… गजानन ! पैज लावून सांगतो, सिनेमा बघताना माझ्या पिढीतला प्रत्येकजण ‘गजा’ झाल्याशिवाय रहाणार नाय. लहानपणी आपण बघितलेली छोटीछोटी, पण त्याकाळात डोंगराएवढी वाटणारी स्वप्नं… ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस घेतलेला ध्यास… लागलेलं वेड… त्यासाठी झालेला त्रास… वेदना… आणि स्वप्नपूर्तीनंतरचा आनंद. हे सगळं-सगळं आठवतं !
फिरोज शेख हा अभिनेता गजा अक्षरश: जगलाय… छोट्या-छोट्या बारकाव्यांनिशी आपल्यासमोर जिवंत केलाय… अलिकडच्या काळात मराठीत एवढे पिच्चर येताहेत, पण अभिनयाच्या बाबतीत मन मोहून टाकेल असा अभिनय नाही बघायला मिळाला… उलट चांगल्या भुमिकांची माती झालेली बघताना घुसमट व्हायची… त्या त्रासातनं इस्लामपूरच्या या पठ्ठ्यानं सुटका केली. लै लै लै समाधान वाटलं. कितीतरी दिवसांनी पडद्यावर एक अस्सलपणे, मनापासुन, अभ्यासून साकारलेली भुमिका पहायला मिळाली. जीव थंडगार झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.