रांची, 21 मे : चार महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मृतदेह गावापासून काही अंतर दूर होता, तसंच चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. झारखंडच्या पालकोटमधील कोडेकेरा गावात ही घटना घडलीय. रुग्णालयात तीन डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केलं. दरम्यान, या प्रकरणी गर्भवती महिलेच्या प्रियकराला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे. तो शुक्रवारी पंजाबहून परत आल्याचं सांगण्यात येतंय.
पालकोटमधल्या तारामुनी कुमारी हिचे गावातीलच सोमरा मुंडासोबत प्रेमप्रकरण होतं. दोघे फोनवर बराचवेळ बोलत असतं, अधून मधून भेटही व्हायची. चार महिन्यांपूर्वी तारामुनी गर्भवती असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी सोमराकडे लग्नाचा तगादा लावला होता. सोमरा लग्नासाठी तयार होता पण त्याचे कुटुंबीयांकडून विरोध केला जात होता. त्यामुळे सोमरा वैतागून कामाच्या निमित्ताने पंजाबला निघून गेला.
आयुर्वेदिक उपचारासाठी म्हणून घरी आला अन् महाराजाने मुलगी पळवली; बीडमध्ये नेमकं काय घडलं?
मुलीच्या घरच्यांकडून सोमरावर लग्नासाठी दबाव टाकला जात होता. मुलीचा भाऊ जोगेंद्र गोपने त्याला फोन करून येण्यासाठी सांगितलं होतं. शुक्रवारी पंजाबमधून तो गावी आलाही होता. तेव्हा मुलीच्या घरी गेला आणि तिला सोबत नेणार असल्याचं सांगून घेऊन गेला. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी तिचा मृतदेह गावाबाहेर आढळून आला.
पालकोट पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल लिंडा यांनी सांगितलं की, मुलीचा भाऊ जोगेंद्र याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुलीचा प्रियकर सोमरावर खूनाचा आरोप केला आहे. या आधारे पोलिसांनी सोमराला ताब्यात घेतलं असून चौकशी केली जात आहे. लवकरच या प्रकरणाचा खुलासा होईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.