मुरैना, 30 मे : अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण करुन पार्थिवाला मुखाग्नी देण्यावेळी अचानक मृत व्यक्ती जिवंत झाला तर? उपस्थितांची काय परिस्थिती होईल? मध्य प्रदेशातील मुरैना येथून असेच विचित्र प्रकरण समोर आले आहे. वास्तविक, एका व्यक्तीला मृत समजून कुटुंबीयांनी त्याला स्मशानभूमीत आणले. अंत्यसंस्काराची सर्व तयारी पूर्ण झाली, मग अचानक लोकांना कळाले की त्या तरुणामध्ये अजूनही जीव आहे. यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर डॉक्टरांना स्मशानभूमीत बोलावण्यात आले. हे अजब प्रकरण मुरैना शहरातील वॉर्ड क्रमांक 47 मधील शांती धामचे आहे.
मुरैना येथे जीतू प्रजापती नावाचा तरुण बऱ्याच दिवसांपासून किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होता. मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना वाटले. काही लोकांनी त्याच्या नाकावर आणि तोंडावर बोट ठेवून त्याचा श्वास तपासला, त्याच्या छातीवर कान ठेऊन त्याच्या हृदयाचे ठोकेही ऐकून तपासले. मात्र, तो जिवंत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना बोलावून त्याची तिकडी सजवली. त्यानंतर शेवटचा प्रवास करून शांतीधाम गाठले, जिथे थोड्याच वेळात तरुणाचा अंत्यसंस्कार होणार होता.
स्मशानभूमीत डॉक्टरांना पाचारण
अंत्यसंस्कारासाठी चिता सजवण्यात आली होती. दरम्यान, शरीर थरथरू लागले. जणू काही तो म्हणतोय की मी जिवंत आहे. ही हालचाल पाहून नातेवाइकांनी तातडीने शांतीधाम येथील डॉक्टरांना बोलावले. जिथे डॉक्टरांनी तरुणाचा ईसीजी तपासल्यानंतर त्याला ग्वाल्हेरला रेफर केले. थोडा उशीर झाला असता तर लोकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले असते. सध्या या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे, जीतू प्रजापतीच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, तरुणाचा मृत्यू झाल्याचं समजून त्याच्या अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र अचानक तो तरुण श्वास घेत असल्याचे दिसून आले.
वाचा – घरच्यांचा विरोध पत्करुन केलं Love Marriage, पण 6 महिन्यातच घडलं भयानक
त्यामुळे डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी ईसीजी केल्यानंतर त्या तरुणाला ग्वाल्हेरला रेफर केले. दुसरीकडे, सीएमएचओ राकेश शर्मा म्हणतात की, त्याच्या नातेवाईकांनी तरुणाला मृत समजून अंतिम संस्कार करण्यासाठी शांतीधाम येथे आणले होते, परंतु शरीरात काही हालचाल झाल्यानंतर त्याला ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.