मुंबई : सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार झालं आहे. इथे तुम्हाला कोणतीही माहिती सर्वात आधी मिळते. शिवाय व्हायरल व्हिडीओ देखील येथे आपल्या समोर येत असतात. हे व्हिडीओ कधी मजेदार असतात. तर कधी हे अंगावर काटा आणणारे असतात. लहान मुलांसंबंधीत देखील अनेक व्हिडीओ आपल्या समोर येत असतात. जे आपण आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करतो. पण सध्या एक असा व्हिडीओ समोर आला आहे. जो तुमच्या हृदयाचा ठोका चुकवत आहे.
हा व्हिडीओ पाहून तुमचा आत्मा हादरेल, कारण या व्हिडीओत एका लहान मुलासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे.
आपण जेव्हा रस्ता ओलांडतो तेव्हा आपण इकडे-तिकडे पाहातो आणि गाडी जवळ नाही ना? हे पाहून आपण रस्ता ओलांडतो. पण असं असलं तरी देखील लहान मुलांना मात्र याची कल्पना नसते आणि ते आपल्याच विश्वास असतात. अशाच एका लहान मुलाने रस्ता ओलांडला, तेव्हा मात्र भयंकर घडलं.
भरधाव वेगात येणाऱ्या कंबाईन हार्वेस्टरसमोर एका मुलाने रस्ता ओलांडला. रस्त्यावर एखादे वाहन येत असल्याचे मुलाच्या लक्षात आले नाही. भरधाव वेगात हार्वेस्टर ट्रक अचानक त्या मुलाला धडकला. तेव्हा रस्त्याच्या पलीकडे उभा असलेला माणूस आणि एक महिला हे सगळं पाहातच राहिले. त्यांना वाटले की या मुलाचे प्राण गेले. पण या मुलाचं नशीब इतक चांगलं होतं की तो यातुन बचावला आहे.
हा मुलगा थोडक्यात बचावला आहे. पण त्याला दुखापत झाली असावी असं सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ चीन मधील असल्याचं देखील सांगितलं जातंय.
तरुण बाईकवरुन जात असताना, रस्त्याच्या कडेला दिसला सिंह आणि… पुढे जे घडलं ते व्हिडीओत कैद
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडिओ @cctvidiots ने ट्विटरवर शेअर केला आहे. अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया दिली.
A very lucky kid from China pic.twitter.com/Smx6XNkUfG
— CCTV IDIOTS (@cctvidiots) April 19, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.