लखनऊ 16 एप्रिल : उत्तर प्रदेशातील कानपूर ग्रामीण भागात एका खोलीत पती-पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तपासात गुंतले आहेत. पोलिसांच्या हाती एक व्हिडिओही लागला आहे. यामध्ये पत्नी आणि मुलांची हत्या करून व्यक्तीने आपल्या व्यथा आणि संताप व्यक्त केला आहे. यानंतर त्यानेही आत्महत्या केली.
इंद्रपाल निषाद बरौर पोलीस स्टेशनच्या हाजीपूरमध्ये पत्नी निशा आणि 12 आणि 8 वर्षांच्या दोन मुलांसह गावाबाहेर एका झोपडीत राहत होता. तो गुजरातमध्ये एका खासगी कंपनीत कामाला होता. आठवडाभरापूर्वी तो घरी आलेला. यादरम्यान त्याने असं काहीतरी पाहिलं, ज्यामुळे तो संतप्त झाला आणि त्याने पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर गळफास लावून घेतला. हे भयंकर पाऊल उचलण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओही बनवला होता.
यामध्ये इंद्रपालने आपली व्यथा आणि संताप व्यक्त केला आहे. तो म्हणाला, “घरात दोन लोक यायचे, त्यांच्यामुळे माझं घर उद्ध्वस्त झालं. चुकीचं पाहिलं की मी चुकीचं केलं.” याप्रकरणी ग्रामस्थांचं म्हणणं आहे की, दुपारी तीनच्या सुमारास एका व्यक्तीची नजर त्यांच्या झोपडीवर पडली. इथे इंद्रपाल लटकलेला दिसला. यानंतर तो आत पोहोचला आणि आतील दृश्य पाहून धक्काच बसला. कपड्यांनी झाकलेल्या बेडवर पत्नी आणि दोन्ही मुलांचे मृतदेह पडले होते.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीवरून बरोर पोलीस ठाण्याच्या पोलिसांसह इतर 3, 4 पोलीस ठाण्यांचा ताफा पोहोचला. यानंतर एसपीही घटनास्थळी पोहोचले. एसपींनी फॉरेन्सिक टीमसोबत कानपूर झोनच्या फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण केलं. घटनास्थळावरून पोलिसांना इंद्रपालच्या मोबाइलवरून तो व्हिडिओ मिळाला, ज्यामध्ये त्याने आपली व्यथा आणि संताप व्यक्त केला होता.
संशयाच्या भूताने संसाराची केली राख रांगोळी, मांझीच्या कृत्याने पोलीस हादरले
याप्रकरणी एसपी बीबीजीटीएस मूर्ती सांगतात की, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. येथे इंद्रपाल फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि बेडवर पत्नी आणि मुलांचे मृतदेह सापडले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.