मुंबई : बँकेतून खातं उघडल्यानंतर तुम्हाला चेकबुक दिलं जातं. हल्ली चेकबुक फार कमी लोक वापरतात पण मोठ्या व्यवहारांसाठी त्याचा वापर केला जातो. चेक बुक वापरताना काही नियम तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं. चेक लिहिताना तुम्हाला त्यावर डाव्या बाजूला दोन आडव्या रेषा द्यावा लागतात.
चेकची माहिती नसल्यामुळे अनेक वेळा लोक फसवणुकीला बळी पडतात. तुम्हाला चेकच्या डाव्या आणि वरच्या बाजूला असलेल्या दोन रेषा का ओढल्या जातात. त्यामागे नेमकं काय कारण असतं जाणून घेऊया.
चेक ही पेमेंट करण्याची खूप जुनी पद्धत आहे. याचा वापर करून ग्राहक कोणालाही रक्कम देऊ शकतो. तुम्ही देखील कधीच ना कधी चेकने पेमेंट केलं असेल. चेकवर लिहिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या असतील, जसं की खात्याचा नंबर, सही, IFSC कोड, ज्याला द्यायचं त्याचं नाव आणि जो देणार त्याचं नाव अशा सगळ्या गोष्टी असतात.
जेव्हा चेक द्यायचा असतो तेव्हा Account to payee साठी चेकवर दोन रेषाही काढल्या जातात ज्या डाव्या कोपऱ्यात काढायच्या असतात. याचा अर्थ या खात्यावरून समोरच्या खात्यावर हा चेक दिल्यानंतर पैसे जमा होणार. जर त्यावर दोन रेषा नसतील तर चेकमधून पैसे दुसऱ्याच्या खात्यावर जमा होणार नाहीत. या दोन रेषा काढल्याानंतर हा चेक कॅश करता येत नाही. ज्याच्या नावावर धनादेश काढला जाईल, त्याच्याच खात्यात पैसे जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.