मुंबई, 3 एप्रिल : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली असून आज आयपीएलचा सहावा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईने आपल्या होम ग्राउंडवर लखनऊचा पराभव केला आहे. चेन्नईने आयपीएल 2023 मधील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात लखनऊचा 13 धावांनी पराभव करून विजय मिळवला आहे.
चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यातील सामना आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला गेला. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्सचा संघ तब्बल 1427 दिवसांनी म्हणजेच जवळपास 4 वर्षांनी आपल्या होम ग्राउंडवर परतला. सामन्याच्या सुरुवातीला लखनऊ सुपर जाएंट्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स देऊन 217 धावा केल्या. यात ऋतुराज गायकवाडने 57, डेव्हॉन कॉन्वेने 47 धावा, शुभम दुबेने 27, मोईन अलीने 19, अंबाती रायडूने 27 तर एम एस धोनीने 2 चेंडूत 12 धावा केल्या. तर इतर फलंदाज समाधानकारक कामगिरी करण्यात यशस्वी झाले नाहीत.या सामन्यात एम एस धोनी ने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 5 हजार धावांचा टप्पा गाठला.
IPL 2023 CSK vs LSG : ऋतुराजचा सुपर सिक्स, टाटाच्या कारवर आदळला बॉल, अशी झाली अवस्था
लखनऊ सुपर जाएंट्सला विजयासाठी 218 धावांचे आव्हान पूर्ण असताना कर्णधार के एल राहुल आणि काइल मेयर्स मैदानात उतरले. सहाव्या ओव्हरमध्ये काइल मेयर्सची विकेट पडली. त्याने लखनऊसाठी सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. एकामागोमाग एक विकेट पडत असताना देखील लखनऊ सुपर जाएंट्सच्या फलंदाजांनी 20 ओव्हरमध्ये 205 धावांपर्यंत मजल मारली. परंतु ते चेन्नईने दिलेले आव्हान पूर्ण करू शकले नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.