दिल्ली, 20 मे : आयपीएल 2023 मधील 67 मॅच चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आली. दिल्ली कॅपिटल्सची टीम त्यांच्या होम ग्राउंडवर आयपीएल 2023 मधील शेवटची मॅच खेळत असून यानिमित्त त्यांनी इंद्रधनुष्य रंगाची जर्सी परिधान केली आहे. यामागचे कारण खूपच कौतुकास्पद आहे.
दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियम चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मॅच रंगली. यात चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या मॅचची विशेषबाब म्हणजे दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांची नेहमीची लाल आणि निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरलेला नाही. तर त्यांनी होम ग्राउंडवरील शेवटची मॅच खेळण्यासाठी इंद्रधनुष्य रंगाची जर्सी परिधान केली आहे. दिल्ली कॅपिटल्सची ही इंद्रधनुष्य जर्सी भारताची विविधता साजरी करते. 2020 पासून दिल्ली कॅपिटल्सची टीम आयपीएलमधील एका मॅचमध्ये ही इंद्रधनुष्य जर्सी घालते.
आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इंद्रधनुष्य जर्सी घातली होती. त्यानंतर या जर्सीचा लिलाव करण्यात आला आणि ही रक्कम कर्नाटकातील इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टला (IIS) मदत म्हणून देण्यात आली. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये 9 व्या स्थानी असून त्यांनी 13 सामन्यांपैकी केवळ 5 सामने जिंकले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.