मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजाऊ होत्या हा इतिहास राज्यपालांनी नीट वाचला असता तर आनंद झाला असता असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा समर्थ रामदासांसोबत दुरान्वये संबंध नव्हता मात्र राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज समर्थ कसे झाले व कुणामुळे झाले हा सांगण्याचा केविलवाणा प्रकार केला आहे असेही महेश तपासे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु राजमाता जिजाऊ होत्या. त्यांनी छत्रपतींना घडवले. सर्व ज्ञानाचे धडे दिले असे असताना समर्थ रामदास यांचा संबंध जोडणे आवश्यक नव्हते असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.