दिल्ली, 19 एप्रिल : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा निकटवर्तीय संतोष सावंत याला भारतात आणण्यात मुंबई क्राइम ब्रांच आणि केंद्रीय तपास यंत्रणांना यश आलंय. छोटा राजनचा निकटवर्तीय आणि फायनान्स सांभाळणाऱ्या संतोष उर्फ अबू सावंतला सिंगापूरमधून भारतात आणण्यात आलं. केंद्रीय संस्था आणि मुंबई क्राइम ब्रांचच्या संयुक्त कारवाईनंतर त्याला दिल्लीत आणलं गेलं.
सध्या अबू सावंत दिल्लीत सीबीआयच्या कोठडीत आहे. गेल्या दोन दशकांपासून छोटा राजनचा हा हस्तक फरार होता. त्याच्याविरुद्ध मोक्कासह अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. अबू सावंतच्या प्रत्यार्पणासाठी २००० मध्ये कागदोपत्री कारवाईला सुरुवात झाली होती. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. दशकभराच्या कालावधीनंतर त्याचे प्रत्यार्पण झाले आहे.
शाळेतून परतणाऱ्या 11 वर्षीय मुलीला कॅब चालकाने दिली लिफ्ट, नंतर केलं भयंकर कृत्य
सिंगापूरमध्ये राहताना अबू सावंत हा हॉटेल व्यवसायाच्या आडून छोटा राजनसाठी काम करत होता. जवळपास २२ वर्षे तो राजनसाठी काम करत होता. सावंतवर मुंबई गुन्हे शाखेसह सीबीआय़कडेही अनेक गुन्हे आहेत. त्यामुळे सीबीआय पहिल्यांदा त्याची कोठडी घेईल. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेला त्याचा ताबा मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.