धाराशिव, 3 एप्रिल : रविवारी महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरात सभा पार पडली. या सभेतून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मात्र दुसरीकडे ही सभा सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.
नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा प्रवेश
धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेचे माजी नगरसेवक अजित करंजकर यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पुण्यामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
काळाराम मंदिर, संयोगीताराजे छत्रपतींच्या वादात मराठा सेवा संघाची उडी; केली मोठी मागणी!
उद्धव ठाकरेंचा निशाणा
दरम्यान काल छत्रपती संभाजीनगरात पार पडलेल्या मविआच्या सभेमधून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आम्ही सत्तेसाठी तळवे चाटले म्हणता, मग तुम्ही मिंदेंचे काय चाटत आहात? असा थेट सवार करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या जाहीर सभेला संबोधन करताना ठाकरेंनी शिंदेंसोबत भाजवरवरही शाब्दीक बाण चालवले. आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन हिंदुत्व सोडलं, मग तुम्ही इतर राज्यांमध्ये विरोधकांसोबत सत्ता स्थापन करुन काय केलं? अशी टीका ठाकरेंनी यावेळी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.