भोपाळ, 19 मे : मध्य प्रदेशातील काही नागा साधू जगाच्या कल्याणाच्या उद्देशाने भर उन्हात रस्त्यावरून साष्टांग नमस्कार घालत प्रवास करत असल्याचे पाहताच तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सध्या हे साधू भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. साष्टांग नमस्कार घालताना कपाळापासून पायापर्यंतचे आठ अवयव जमिनीला स्पर्श करतात. आपल्या पूज्य देवतेची आराधना करण्यासाठी हे नागा साधू भर उन्हात रस्त्यावरून साष्टांग नमस्कार घालत प्रवास करत आहेत. उन्हाळ्यात तापलेल्या डांबरी रस्त्यांवर घोंगडी टाकून त्यावर साष्टांग नमस्कार घालत ते प्रवास करत आहेत. त्यांचा हा प्रवास तमिळनाडूतील रामेश्वरमपर्यंत असेल. आतापर्यंत या साधूंनी चार हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास पूर्ण केला आहे.
जगाच्या कल्याणासाठी या साधूंनी जून 2022 पासून उत्तराखंडातील गंगोत्रीपासून साष्टांग नमस्कार घालत आपला आध्यात्मिक प्रवास सुरू केला असून, तो तमिळनाडूतील रामेश्वरपर्यंत असेल. या नागासाधूंनी चार हजार किलोमीटर प्रवास केला असून, ते आता भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात पोहोचले आहेत. त्यांनी भद्राचलम येथील श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिरात विशेष पूजा केली आणि प्रवासाला सुरुवात केली. आम्ही पहाटेपासून रामेश्वरमच्या दिशेने साष्टांग नमस्कार घालत प्रवास सुरू करतो. रात्रीच्या वेळी विश्रांती घेतो, असं या साधूंनी सांगितलं. हा पाच साधूंचा गट असून, गटातील तीन साधूंचा अशा प्रकारे आध्यात्मिक प्रवास सुरू आहे. उर्वरित दोन साधू वाहनातून प्रवास करत सर्वांच्या भोजनाची व्यवस्था पाहत आहेत.
शनिदेवाचा प्रकोप टाळायचा असेल तर शिवलिंगावर अर्पण करा या 7 गोष्टी
“कपाळ, छाती, हातांचे तळवे, गुडघे आणि पायाचे चौडे असे शरीराचे आठ अवयव वापरून जमिनीला पूर्ण स्पर्श करून देवाला भक्तिभावाने साष्टांग नमस्कार केल्यावर सर्व पापांमधून मुक्ती मिळते,“ असे या नागा साधूंनी सांगितलं. भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील लोक या नागा साधूंना त्यांची यात्रा कोणत्याही अडथळ्याविना यशस्वी होवो, अशा शुभेच्छा देत आहेत. नागासाधूंची जगाच्या कल्याणासाठी सुरू असलेली ही अनोखी यात्रा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
जगाच्या कल्याणासाठी नागा साधूंची गंगोत्री ते रामेश्वरम यात्रा; भर उन्हात साष्टांग दंडवत घालत प्रवास pic.twitter.com/0kBvGAf1rz
— News18Lokmat (@News18lokmat) May 19, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.