नवी दिल्ली, 26 मार्च : जगातली अनेक ठिकाणं वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणं समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखली जातात, काही ऐतिहासिक महत्त्वामुळे ओळखली जातात, तर काही ठिकाणी स्वच्छता आणि सुंदरता इतकी असते की आपली नजर तिथून हटत नाही. नेदरलँड्समध्ये असं एक गाव आहे, जिथे रस्तेच नाहीत. होय. तुम्ही बरोबर वाचत आहात, तिथे रस्ते नसलेलं गाव आहे आणि ते गाव खूपच सुंदर आहे. या गावात कार, बाइक यासारखी वाहनंही नाहीत. या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय.
या गावात राहणारे लोक त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी बोटीचा वापर करतात. नदीकाठी असलेलं हे गाव सर्वात लहान गाव आहे. इथलं प्रदूषणमुक्त नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी दूरवरून लोक भेटी देतात. या गावातली टुमदार घरं आणि नदीतलं स्वच्छ पाणी पाहून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. आज या गावाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
हेही वाचा – फ्रीजचा होऊ शकतो स्फोट, तुम्ही करू नका ‘या’ चुका; वाचा काय सांगतात मेकॅनिक
गावात एकही रस्ता नाही
आपण नेदरलँडमधील गिथॉर्न या छोट्याशा गावाबद्दल बोलत आहोत. हे गाव पाहिल्यास इथं अप्सरा राहतात, असं वाटेल. हे गाव इतकं रमणीय आहे की ते बघून तुम्हालाही त्याची भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही.
नेदरलँड्सचं व्हेनिस अशी ओळख
या गावात एकही रस्ता नाही. त्यामुळे याला नेदरलँड्सचं व्हेनिस असंही म्हटलं जातं. गावात रस्ते नाहीत, त्यामुळे लोक कार किंवा बाइक खरेदी करत नाहीत. इथे फक्त बोटीचा वापर केला जातो.
दूरवरून लोक फिरायला येतात
इथे फक्त बोटी दिसतात. त्यामुळे लोक दुरून इथं फिरायला येतात. या ठिकाणचं सौंदर्य पाहून लोक इथे येण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.
कोणतही प्रदूषण नाही
या गावात रस्ता नाही त्यामुळे इथे कार किंवा बाइक धावताना दिसत नाहीत. परिणामी गावात प्रदूषण अजिबात दिसत नाही. इथं अनेक लाकडी पूलही बांधण्यात आले आहेत.
गावात आहेत 180 पूल
या गावात एकूण 180 पूल आहेत, तसंच या गावाची एकूण लोकसंख्या सुमारे तीन हजारच्या जवळपास आहे. इथे प्रत्येक कुटुंबाची स्वतःची बोट आहे. हिवाळ्यात या ठिकाणी बर्फ पडतो, त्यामुळे इथे आईस स्केटिंगचा आनंदही लुटता येतो. हे स्वच्छ आणि प्रदुषणमुक्त गाव पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. पर्यटक इथे सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.