नवी दिल्ली 11 मे : बऱ्याच काळापासून कल्पना केली जात आहे की असं मूल जन्माला येऊ शकतं का, ज्याला कोणताही आनुवंशिक म्हणजेच जेनेटिक आजार नसेल? या प्रश्नाचं उत्तर आता सापडलं आहे. जगात पहिल्यांदाच अशा मुलाचा जन्म झाला आहे, ज्याला कोणताही आनुवंशिक आजार नसेल. तसेच त्याच्या शरीरात कोणतेही जेनेटिक म्युटेशनही दिसणार नाहीत. त्याला जो आजार होईल, त्या सर्वांचे उपचार करणं शक्य असेल. याला पहिले सुपरबेबी म्हटलं जात आहे. हे बाळ तीन लोकांच्या डीएनएमधून जन्माला आलं आहे. या बाळात त्याच्या पालकांच्या डीएनएबरोबरच आणखी एका महिलेचा डीएनएही घेण्यात आला आहे. या बाळाची सध्या चांगलीच चर्चा होते. या बाळाच्या जन्मासाठी शास्त्रज्ञांनी नेमकी कोणती टेक्नॉलॉजी वापरली, ते आणि इतर माहिती जाणून घेऊयात.
मेडिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून हे चमत्कारापेक्षा कमी नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मुलाचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आहे. मायटोकॉन्ड्रियल रोग टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टेक्निकच्या मदतीने हे मूल जन्माला आलं आहे. यामध्ये, निरोगी महिलेच्या बीजांडामधून टिशु घेतले जातात. त्यानंतर यापासून आयव्हीएफ भ्रूण तयार केले जातात. हे भ्रूण हानिकारक म्युटेशनपासून मुक्त असतात, जे आईपासून त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात. म्हणजेच ज्या गर्भात तो जन्माला आला, तो गर्भ त्या स्त्रीच्या आनुवंशिक आजारांपासून पूर्णपणे सुरक्षित असेल. आईच्या शरीरात काही आजार असेल तर तो बाळाला होत नाही.
नवजात बालक जन्माला येताच का रडतं? तुम्हाला माहितीय याचं कारण?
शास्त्रज्ञांच्या मते, नवजात मुलांचे आनुवंशिक रोगांपासून संरक्षण करण्याचा हा सर्वात यशस्वी मार्ग आहे. खरं तर हा आयव्हीएफ तंत्राचा एक सुधारित प्रकार आहे. यात तयार झालेल्या गर्भामध्ये जैविक पालकांचे शुक्राणू आणि अंडी यांचे मायटोकॉन्ड्रिया मिसळले गेले आहेत. मायटोकॉन्ड्रिया हे कोणत्याही पेशीचे पॉवर हाऊस आहे. कितीही हानिकारक म्युटेशन झाले तरी ते या पॉवर हाऊसमध्ये साठवले जातात. ते नंतर मुलाच्या आरोग्यावर परिणाम करतात. बऱ्याचदा यामुळे महिलांना प्रेग्नन्सीमध्ये अडचणी येतात. गर्भधारणा यशस्वी झाल्यावर बाळांना जेनेटिक आजार होतात, परिणामी त्याची तब्येत बिघडते.
रिपोर्ट्सनुसार, या संपूर्ण प्रक्रियेत 99.8 टक्के डीएनए आई-वडिलांकडून घेण्यात आला आणि बाकीचा डीएनए जन्म देणाऱ्या महिलेकडून घेण्यात आला. मुलाकडे त्याच्या पालकांचा न्यूक्लिअर डीएनए असेल, ज्याला व्यक्तिमत्व आणि डोळ्यांचा रंग यांसारखी प्रमुख वैशिष्ट्ये पालकांकडून मिळालेली असतील. पण तिसरा डीएनए असलेल्या महिलेचाही डीएनए त्याच्या शरीरात असेल. हे बाळ मात्र त्याच्या पालकांसारखंच दिसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.