येडगाव, जुन्नर प्रतिनिधी रायचंद शिंदे : अवकाळी पावसानं आधीच पिकाचं नुकसान झालं आहे. त्यात आता शेतकऱ्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्याला अक्षरश: 2 ते 3 रुपये भाव मिळाल्याने जगायचं कसं हा प्रश्न त्याच्यासमोर आहे.
उन्हाळी हंगामातील टोमँटोचे आगार म्हणून ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यात टोमँटोला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने टॉमटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. काही शेतक-यांच्या टोमॅटोच्या बागा मात्र तोडणीवाचून वाया जाऊ लागला आहे.
Wardha News: खासगी नोकरी सोडली अन् लावली आमराई, आता लाखोंची करतो कमाई, Video
बागेत पिकलेली फळे तोडणीवाचून शेतातच आहेत. किलोला 2 ते 3 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. कल्याण नगर महामार्गावर राजुरी येथील बाजारात विक्रीसाठी आलेल्या टोमँटोची विक्री न झाल्याने गाडीभाडेही वसुल न झाल्याने एका शेतक-याने टोमँटो रस्त्यावरच फेकून दिला.
एकीकडे अवकाळी पाऊसाच्या संकटाने शेतकरी हतबल झाला असताना दुसरीकडे शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडत आहेत. टोमॅटोची सर्वाधिक लागवड असलेल्या येडगावमध्ये ही अशी परिस्थिती आहे.
OMG! आता चहाही फोडणार घाम, बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘या’ गोष्टीचे भाव वधारले
टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी रस्त्यावर फेकून देण्यात आला आहे. येत्या काळात टोमॅटोची कमतरता भासू शकते त्यामुळे भावही वाढू शकतात. दुसरीकडे मोचा चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अलर्ट दिला आहे. त्यामुळे शेतात असलेलं पिक सडत आहे. शेतकऱ्याचं दोन्ही बाजूंनी नुकसान होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.