मुंबई, 21 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये शुक्रवारी 29 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात खेळवण्यात आला. सामन्यात चेन्नईने हैद्राबादवर 7 विकेट्सने विजय मिळवला असून चेन्नईने आयपीएल 2023 मधील चौथा सामना जिंकला. या सामन्यात रवींद्र जडेजाच्या भेदक गोलंदाजीसमोर हैद्राबादच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.
चेपॉक स्टेडियमवरील सामन्यात एम एस धोनीने सुरुवातीला टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवत सनरायजर्स हैद्राबादच्या 7 विकेट्स घेऊन त्यांना 134 धावांवर रोखलं. चेन्नई सुपरकिंग्सच्या गोलंदाजीमध्ये ऑल राउंडर रवींद्र जडेजाची खेळी या सामन्यात गेम चेंजर ठरली. रवींद्र जडेजाने या सामन्यात तब्बल तीन विकेट्स घेतल्या.
‘… मग पाहाते तुला कोण वाचवतं’, मोहम्मद शमीच्या पत्नीने सोशल मीडिया पोस्ट करत दिली धमकी
प्रथम जडेजाने 10 वी ओव्हर सुरु असताना हैद्राबादकडून मैदानावर चौफेर फटकेबाजी करणाऱ्या अभिषेक शर्माची विकेट घेतली. अभिषेकने संघासाठी 34 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर राहुल त्रिपाठी रवींद्र जडेजाच्या फिरकीचा शिकार ठरला आणि शॉट मारण्याच्या प्रयत्नात कॅच आउट झाला. तर 14 व्या ओव्हरमध्ये जडेजाने मयंक अग्रवालची विकेट घेतली. अशा तऱ्हेने जडेजाने सामन्यादरम्यान महत्वाच्या वेळी सनरायजर्स हैद्राबादच्या 3 विकेट घेऊन त्यांच्या फलंदाजांना गुडघ्यावर आणले. तर रवींद्र जडेजा शिवाय चेन्नई सुपरकिंग्स कडून आकाश सिंह, माथेशा पाथीराणा, एम थेक्षाना यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेऊन केवळ 22 धावा दिल्या यासाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.