मुंबई : फिक्स डिपॉझिटकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे सहाजिकच आपल्याकडील काही पैसे हे फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवले जातात. ते पैसे इमरजन्सीच्या काळात वापरता येतील असा आपला एक अंदाज असतो. आता स्मॉल फायनान्स बँकेनं सर्वात बेस्ट ऑफर दिली आहे. अशी ऑफर तुम्हाला कुठेच आतापर्यंत मिळणार नाही.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने मुदतीपूर्वी पैसे काढण्याच्या सुविधेसह 2 कोटी रुपयांच्या खाली FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर 22 मे 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. नवीन दर नवीन एफडीसाठी तसेच विद्यमान एफडी रिन्यू केल्यास लागू होणार आहेत.
5 वर्षांची FD एक वर्षात मोडली तर काय? पैसे कमी मिळतात का?
बँक 7 ते 45 दिवसांच्या FD वर 4 टक्के व्याजदर आणि 46 ते 90 दिवसांच्या दरम्यानच्या FD वर 4.75 टक्के व्याजदर देत आहे. 91 ते 180 दिवसांच्या FD वर आता 5.50 टक्के व्याज मिळेल, तर 181 ते 364 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 6.50 टक्के रिटर्न्स बँकेकडून दिले जाणार आहेत.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 365-699 दिवसांच्या एफडीसाठी 7.75 टक्के आणि 700 दिवस ते 999 दिवस पैसे ठेवल्यास 8.00 टक्के व्याजदर देते. हे 1000 दिवस ते 1500 दिवसांसाठी FD ठेवली तर ग्राहकांना 8.25% रिटर्न्स मिळणार आहेत. बँक 701 दिवसांपासून ते पाच वर्षांच्या एफडीवर 7.50 टक्के व्याजदर देईल, तर 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीसाठी बँक 7 टक्के व्याज देणार आहे.
Best FD Rates : 399 दिवस पैसे गुंतवा आणि जबरदस्त रिटर्न मिळवा, ही बँक देते बेस्ट ऑफर
सीनियर सिटीझनसाठी देखील 4.75 ते 8.85 अशा वेगवेगळ्या ऑफर्स लागू करण्यात आल्या आहेत. तसंच स्मॉल सेविंग बँक किंवा कॉरपोरेट बँकांसाठी 5 लाखांपर्यंतच्या मुदतीवर विमा उतरवला जातो. ज्यात बँक बुडाली किंवा तुमच्या FD चं नुकसान झालं तर बँकेला देणं बँधनकारक असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.