मुंबई, 21 एप्रिल : खागघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील विरोधकांनी केली आहे. अशातच आता या प्रकरणावर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र भूषण कार्यक्रम राज्य सरकारचा असतो, त्याची 100 टक्के जवाबदारीही सरकारची असते”, असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस विभागाच्या शिबीरात बोलत होते.
घटनेची संपूर्ण जबाबदारी सरकारची : शरद पवार
तुमच्या शहरातून (मुंबई)
महाराष्ट्र भूषण कार्यक्रम महाराष्ट्र सरकारचा असतो. त्याची 100 टक्के जबाबदारी देखील सरकारची आहे. धर्माधिकारी यांच्या सहमितीने कार्यक्रम आयोजित केला नव्हता. महाराष्ट्र सरकारने आपल्यानुसार केला आहे. अनेक लोक मृत्यूमुखी पडले. याची जबाबदारी कोणाची हा प्रश्नच नाही. प्रचंड शक्ती दाखवून निवडणुकीमध्ये फायदा मिळवण्याचा प्रयत्न होता. पण त्याची किंमत महाराष्ट्रतील जनतेला चुकवावी लागली, अशी टीका शरद पवार यांनी राज्य सरकारवर केली आहे.
पुढे ते म्हणाले, की देशात अनेक गोष्टी घडत असून त्यावर पडदा टाकण्याचं काम केलं जात आहे. सत्य आणि वस्तुस्थिती लोकांसमोर येऊ नये यासाठी प्रयन्त करत आहेत. पुलवामा हल्ल्यामध्ये 40 जवान मृत्यूमुखी पडले. याची चौकशी झाली का? राज्यपाल यांनी सांगिलते की धोक्याची इशारा देऊनही सरकारने विमान दिले नाही. देशसेवेसाठी जवान मृत्यूमुखी पडले. वरिष्ठ अधिकारी सूचना करतात की बाहेर बोलू नका, सुविधा देण्यात आली नाही, असे राज्यपाल सांगतात. याची योग्य प्रकारे चौकशी झाली नसल्याचे पवार म्हणाले.
वाचा – जन्मदात्या बापालाच काढलं घराबाहेर? राष्ट्रवादीच्या आमदारावर आरोप, धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल
देशात रोज काहीतरी घडते. गुजरातमध्ये दंगली झाल्या. त्या लोकांना अटक झाली आणि लगेच त्यांना जामीन देण्यात आला. हायकोर्टाने आदेश दिले की सगळे लोक निर्दोष आहे. अशा लोकांना सोडणे म्हणजे संविधानाची हत्या झाली आहे. आज अनेक प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी, अतिवृष्टी, शेतकरी आत्महत्या असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. राज्यात सत्तेचा गैवापर केला जात आहे. काही बोलले की शहनपणाने गप्प बस नाही तर ईडी लावली जाईल. ईडी हा शब्द घराघरात पोहचला आहे. राज्याचा गृहमंत्री वर 100 कोटीचा वसुलीचां आरोप होता. शेवटी सवा कोटी रुपयाचा निधी निघाला तेही संस्थेसाठी निधी निघाला. यासाठी 13 महिने जेल देण्यात आली. संजय राऊत यांच्यावर केस टाकून जेलमध्ये टाकण्यात आले. आज सांप्रदायिक विचाराची शक्ती वाढली आहे. देशात काही न काही करून सत्तेच गैरवापर केला जात आहे. लढावं लागेल जी काही किमंत मोजावी लागेल तरी हरकत नाही, असे आवाहन शरद पवार यांनी उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांना केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.