कोल्हापूर, 20 एप्रिल : राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच आता कोल्हापुरातून आणखी एक बातमी समोर आली आहे.
बाजार समितीत शिंदे आणि ठाकरे गटाची युती तुटली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी ठाकरे आणि शिंदे गटाची युती तुटली. काल पदाधिकाऱ्यांनी पॅनल करताना शिंदे गटाला सोबत घेतले होते. पण आज शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखानी शिंदे गटासोबत न जाण्याचा निर्णय घेतल्याने ही युती तुटली आहे. तर शिंदे आणि ठाकरे गट एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर आता ही युती तुटल्याची माहिती समोर आली आहे.
तुमच्या शहरातून (कोल्हापूर)
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात उलथापालत होत असल्याचे चित्र दिसत आहे. आता बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट एकत्र आले होते. पण आता दुसऱ्याच दिवशी ही युती तुटली आहे. बाजार समितीच्या अठरा जागांसाठी ही निवडणूक होत असून या निवडणुकीत आता चांगलीच रंगत येणार आहे. सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आता पुन्हा एकदा धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागर आणि ठाकरे गट निवडणूक रिंगणात उतरला आहे.
दुसरीकडे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाडगे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सत्यजित आबा सरूडकर, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी, प्राध्यापक जयंत पाटील, भाजप किसान मोर्चाचे भगवान काटे यांच्यात सुरू असलेल्या बैठका नवीन पॅनल जाहीर करण्याचे संकेत देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.