मुंबई, 7 एप्रिल : जितेंद्र आव्हाड आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शदर पवार यांची भेट घेणार आहेत. ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरला आले आहेत. शरद पवार यांची भेट घेऊन आव्हाड ठाण्यातील रोशनी शिंदे प्रकरणाची त्यांना माहिती देणार आहेत. दरम्यान यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी चंद्रकांत पाटील प्रयत्न करणार असतील तर आम्ही त्याचं स्वागतच करून, चांगल्या गोष्टीला आमचं समर्थन असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
शिंदेंवर निशाणा
दरम्यान यावेळी बोलताना रोशनी शिंदे प्रकरणावरून आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.जे-जे विद्रोही आहेत, परिस्थितीविरोधात उभे राहून झगडत आहेत, त्यांची कुठलीही लढाई असो त्यांच्या पाठिशी उभं राहणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. रोशनी शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीली म्हणून त्यांना मारण्यात आलं. तिच्या पोटावर लाथा मारण्यात आल्या तिला आई होण्यापासून रोखणे योग्य आहे का? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, पत्रकारांनाही दम दिला गेला, स्मिता आंग्रे यांनी तक्रार केली म्हणून त्यांनाही दम दिला गेला. छत्रपती संभाजीनगरमधील त्या रॅपरचा पोलीस शोध घेत आहेत. आज नामदेव ढसाळ असते तर त्यांना तुरुंगात टाकले असते. हे सर्व बंडखोर आहेत, परिस्थिती मानसाला बंडखोर करते मग तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.