भारतीयांच्या पारंपरिक आणि प्रसिद्ध ‘जुगाड’ टेक्नॉलॉजीनं जगात अनेकांना भुरळ घातलीय. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये एका व्यक्तीनं फोन पे चा साउंड बॉक्स तुम्ही दुकानात पाहिला असेल त्याचा एक अजब वापर एकाने केला आहे. सध्या हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत असून, सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.
जेव्हा तुम्ही एखाद्या दुकानात क्युआर कोड स्कॅन करून पैसे देता, तेव्हा एका स्पीकर मधून मोठ्यानं आवाज येतो की, दुकानदाराच्या अकाउंटमध्ये किती पैसे आले आहेत. या स्पीकरला ‘साउंड बॉक्स’ म्हणतात. पेटीएम, फोन पे अशा विविध कंपन्यांचे असे साउंड बॉक्स केवळ दुकानांमध्येच नाही तर रस्त्यावरील हातगाड्यांवरसुद्धा दिसतात. पण एका व्यक्तीनं फोन पे कंपनीच्या साउंड बॉक्ससाठी जुगाड टेक्नॉलॉजी वापरली आहे. त्या स्पीकरचा त्याने अनोखा वापर केला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पडत असून काही यूजर्सच्या मते, फोन पे कंपनीनंसुद्धा कधी त्यांनी तयार केलेल्या साउंड बॉक्सचा उपयोग अशा पद्धतीनं केला जाऊ शकतो, याचा विचार केला नसेल, अशी कमेंट दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.