नवी दिल्ली 08 मे : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचं विमान मुसळधार पावसामुळे लाहोर विमानतळावर उतरू न शकल्याने सुमारे 10 मिनिटं भारतीय हवाई हद्दीत होतं. रविवारी एका बातमीत ही माहिती समोर आली आहे. ‘द न्यूज’च्या बातमीनुसार, 4 मे रोजी रात्री 8 वाजता मस्कतहून परतलेले पीआयएचं विमान ‘पीके248’ मुसळधार पावसामुळे लाहोरमधील अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरू शकलं नाही.
बातम्यांनुसार, एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या सूचनेनुसार, पायलटने आसपास विमान उडवणं सुरूच ठेवलं आणि यादरम्यान मुसळधार पाऊस आणि कमी उंचीमुळे त्याचा रस्ता चुकला. त्यानंतर 13,500 फूट उंचावरुन उडणारं विमान भारतीय हवाई हद्दीत दाखल झालं.
भारताच्या पंजाबमधील तरनतारन आणि रसूलपूर शहरातून ४० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर विमान परतलं. वृत्तानुसार, पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर विमानाने मुल्तानसाठी उड्डाण केलं. त्यानुसार, विमानाने सुमारे दहा मिनिटं भारतीय हद्दीत एकूण 120 किलोमीटरचं उड्डाण केलं.
स्वर्गाच्या वाटेत आहे भारतातली शेवटची चहाची टपरी, खरंच हे शक्य आहे का?
292 किमी/तास वेगाने 13,500 फूट उंचीवर उड्डाण करत पाकिस्तानी विमानाने भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला. विमानाने भारतीय हद्दीत ४० किमी पेक्षा जास्त अंतर पार केलं आणि तरनतारन साहिब आणि रसूलपूर शहरांवरून गेलं. त्यानंतर विमानाने पाकिस्तानी हवाई हद्दीत पुन्हा प्रवेश केला.
भारतीय हवाई हद्दीत उड्डाण करताना वैमानिकाने विमान 20,000 फूट उंचीवर नेलं. विमानाने सात मिनिटं भारतीय हवाई हद्दीत उड्डाण केलं. इतर मीडिया रिपोर्ट्सनुसार, PIA पायलटने भारतीय विमान वाहतूक अधिकाऱ्यांना त्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली आणि भारतीय हवाई वाहतूक नियंत्रणाने PIA विमानाला मुल्तानला जाण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिली.
विमानाने पुन्हा एकदा पाकिस्तानी पंजाबमधील कसूर जिल्ह्यातील डोना मब्बोकी, चांट, धुपसारी कसूर आणि घाटी कलंजर या गावांमधून भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला. तीन मिनिटांनंतर विमानाने भारतीय पंजाबमधील लाखा सिंगवाला हिथर गावातून पुन्हा पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला. त्यावेळी विमान 23,000 फूट उंचीवर होते आणि 320 किमी वेगाने धावत होते. नंतर हे विमान मुल्तानमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.