बंगळुरू, 18 एप्रिल : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली बंगळुरूत चिन्नास्वामी स्टेडियमवर काल आमने सामने आले होते. आरसीबी आणि चेन्नई यांच्यात झालेला सामना चेन्नईने 8 धावांनी जिंकला. या सामन्यावेळी एमएस धोनी आणि विराट कोहली काही वेळ बोलताना दिसले. याचा व्हिडीओ आय़पीएलने ट्विटरवर शेअर केला आहे.
धोनी आणि विराट हे या सामन्यावेळी एका निवांत क्षणी गप्पा मारताना दिसले. धोनी आणि विराट यांच्यातलं नातं नेहमीच खास असं राहिलं आहे. विराट कोहलीने धोनी किती संपर्कात आहे आणि तो कसा आहे याचा याआधी अनेकदा उल्लेख केला. जेव्हा कर्णधार पद सोडलं तेव्हा फक्त धोनीच असा होता ज्याने कॉल केला असंही विराटने सांगितलं होतं. धोनीच्याच नेतृत्वाखाली विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीतील बहुतांश सामने खेळले आहेत. विराट कर्णधार असतानाही धोनीकडूनच मैदानावर तो सल्ला घेत असे.
A legendary duo @imVkohli @msdhoni
❤️ #TATAIPL | #RCBvCSK pic.twitter.com/5sOQDkdBLb
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.