कृष्ण गोपाल द्विवेदी, प्रतिनिधी
बस्ती, 19 मे : साप जरी नाव ऐकलं तर भलेभले पळ काढतात. पण जर एकाचवेळी अनेक साप तेही किंग कोब्रा असतील तर मग काय होईल याचा विचार केला नाही तो बरा. पण उत्तर प्रदेशमधील बस्सी या भागात एकाच झाडावर अचानक 12 पेक्षा जास्त विषारी नाग आढळून आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशमधील बस्ती जनपद येथील गौर पोलीस स्टेशन हद्दीतील अजगेवा जंगलात हा व्हिडीओ समोर आला आहे. एका झाडावर एक नाही दोन नाहीतर जवळपास डझनभर किंग कोब्रा आढळून आले. विशेष म्हणजे, हे झाड चंदनाचं नव्हतं, तर एक जंगली झाड होतं. या झाडावर सापांनी एकच ठिय्या मांडला होता.
व्हायरल झालेला हा व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, झाडावर जवळपास डझनभर साप ठिय्या मांडून बसले आहे. फणा काढून हे साफ निवांतपणे बसलेले पाहण्यास मिळाले. जेव्हा स्थानिक लोकांना कळलं ही कोब्रा साप झाडावर बसलेले आहे, तेव्हा गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. पण पुढे जाण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती.
(घरात सापडला 15 वर्षांचा कोब्रा, शेपटी पकडली तर बुटाला घेतला चावा, PHOTOS)
मोठी हिंमत करून दोन माणसं या झाडाजवळ गेली. त्यांनी आधी सापांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण, सापांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. निवांत बसलेले साफ फणा काढून शांतपणे बसलेले होते. मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाने स्टीकच्या मदतीने मोबाईल नागांच्या तोंडाजवळ नेला, पण त्याने काही दंश मारला नाही.
(गाडलेला मृतदेह काढून खातो मांस, मांजरीसारखा दिसणाऱ्या ‘बिज्जू’ आहे तरी कोण? जाणून घ्या रंजक माहिती)
पुढे व्हिडीओमध्ये असंही दिसत आहे की, एका व्यक्तीने झाडाची फांदी सापांवर उगारली. पण, तरीही सापांनी काही प्रतिसाद दिला नाही, ना पलटवार केला. आतापर्यंत असं दृश्य कुणी पाहिलेलं नाही. विषारी साप हे प्रचंड आक्रमक असतात. पण, इथं चित्र मात्र उलट होतं. विचार मग्न झालेले साप शांतपणे झाडावर बसलेले होते.
गावाला लागून जंगल असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात साप फिरत असतात. त्यामुळे सापांचं दर्शन होणं नवी गोष्ट नाही. यामुळे स्थानिक लोक घाबरलेली असतात. पण, आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात साप तेही झाडावर बसल्याचे पाहण्यास मिळाले, अशी प्रतिक्रिया स्थानिक गावकरी राम चरण यांनी दिली. बराच वेळ सापांनी ठिय्या मांडलेला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.