मुंबई, 25 एप्रिल : बरेच लोक रात्री झोपताना दिशेची फारशी काळजी घेत नाहीत. बहुतेक लोकांच्या लक्षात येत नाही की, चुकीच्या दिशेला झोपल्यानं त्यांच्या आयुष्यात समस्या उद्भवू शकतात. विशेषत: विवाहित जोडपे चुकीच्या दिशेने झोपले तर त्यांच्या वैवाहिक जीवनात संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घरामध्ये वास्तुदोष असल्यास किंवा काही कारणाने वास्तुदोष वाढीस लागल्यास वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. त्यामुळे नात्यात कटुता येते. वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीने झोपताना काही खास गोष्टींची काळजी घेतली तर त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्या आपोआप संपतात, असे मानले जाते.
वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, झोपल्याने त्यांच्यातील संबंध सुधारतात. पती-पत्नीमध्ये चांगला समन्वय साधण्यासाठी वास्तुशास्त्रात पती-पत्नीच्या झोपेच्या दिशेबाबत काही सूचना देण्यात आल्या आहेत. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु तज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी याविषयी वास्तुशास्त्राचे काही सोपे नियम सांगितले आहेत.
विवाहित जोडप्यांच्या बेडरूमसाठी वास्तू टिप्स –
वास्तुशास्त्रानुसार विवाहित जोडप्यांनी त्यांच्या बेडरूमची रचना करावी. त्यामुळे त्यांचे हे नाते नेहमीच घट्ट राहते. वास्तुशास्त्रानुसार, विवाहित जोडप्यांची बेडरूम नैऋत्य दिशेला असावी. जर जोडप्याचे नवीन लग्न झाले असेल आणि ते पालकांसोबत राहत असतील तर शक्य असल्यास बेडरूम वायव्य दिशेला असावी. विवाहित जोडप्यांसाठी वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, त्यांची बेडरूम ईशान्य दिशेला असू नये. या दिशेचा विवाहित जोडप्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
वास्तुनुसार पलंगाची दिशा –
वास्तुशास्त्रानुसार, विवाहित जोडप्यांचा पलंग खोलीच्या नैऋत्य भिंतीला लागून असावा. विवाहित जोडप्यांच्या पलंगाच्यासमोर दरवाजा नसावा याची काळजी घ्यावी. वास्तूनुसार विवाहित जोडप्यांनी दक्षिण, आग्नेय किंवा नैऋत्य दिशेकडे डोके करून झोपावे. झोपताना उत्तर दिशेला डोकं करून अजिबात झोपू नये. असं केल्यानं तुम्हाला तणाव आणि थकवा जाणवू शकतो.
हे वाचा – उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडण्याचे हे चमत्कारिक फायदे; हसतं-खेळतं राहतं कुटुंब
विवाहित जोडप्यांना झोपण्यासाठी वास्तु टिप्स –
विवाहित जोडप्यांनी नेहमी लक्षात ठेवावे की, पलंगाच्या वर कोणतीही तुळई शक्यतो येत नसावी. वास्तुशास्त्रानुसार पलंगाच्या अगदी वर लाईट नसावी.
विवाहित जोडप्यांनी आपल्या बेडरूममध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन, चार्जर इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स न ठेवण्याचा प्रयत्न करावा.
विवाहित जोडप्यांनी झोपताना योग्य दिशेची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. विवाहित जोडप्यांनी आपला बिछाना अशा प्रकारे ठेवावा की, त्यांचे डोके दक्षिणेकडे होईल.
हे वाचा – शनी मागे लागलाच म्हणून समजा; जीवनात अशी कामं करणाऱ्यांना शनी सोडत नाही कधी
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.