विजय वंजारा, मुंबई 01 एप्रिल : दुचाकीवरील स्टंटचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला असून यात एक तरुण दोन तरुणींसह धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील असून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओमध्ये तरुणाने एका तरुणीला पेट्रोलच्या टाकीवर बसवलेलं दिसतं, तर दुसऱ्या तरुणीला पाठीमागे बसवलं आहे.
दोन्ही तरुणींना बाईकवर बसवून हा तरुण त्यांच्या मध्ये बसून गाडी चालवताना दिसतो. यानंतर हा तरुण वेगाने दुचाकी पळवताना आणि स्टंट करताना दिसतोय. रात्रीच्या वेळचा हा व्हिडिओ असून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा व्हिडिओ बीकेसी भागातील असल्याची माहिती समोर आली आहे.
टाकीवर एक अन् पाठीमागे दुसरी; मुंबईतील युवकाचा 2 तरुणींसह दुचाकीवर जीवघेणा स्टंट, VIDEO VIRAL pic.twitter.com/LGfbp2tweJ
— News18Lokmat (@News18lokmat) April 1, 2023
तुमच्या शहरातून (मुंबई)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.