मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. हुकमी एक्का आणि मॅच विनर म्हणून पाहिलं जाणारे खेळाडूच टीममधून बाहेर झाले आहेत. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे. WTC Final आधीच खेळाडू बाहेर पडल्याने रोहित समोर रिप्लेसमेंटसाठी प्रश्न आहे.
ओपनर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम ७ जूनपासून लंडनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्यासाठी टीम जाहीर केली असली तरी आयपीएलदरम्यानच एकापाठोपाठ एक वाईट बातम्या येत आहेत.
एक सोडून चार चार खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडले असून ते मैदानापासून दूर राहणार आहेत. त्यामुळे ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपचा सामना देखील खेळू शकणार नाही. त्यामुळे आता त्यांची जागी कुणाला संधी द्यायची हे टीम इंडियासमोर आव्हान असणार आहे. कोणते चार खेळाडू जखमी झाले आहेत जाणून घेऊया.
MI vs CSK सामन्यावर पावसाचे संकट; प्ले ऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना
आयपीएलचे तीन सामने खेळल्यानंतर नेट प्रॅक्टिसदरम्यान जयदेव उनादकटच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला पुढचे सामने आयपीएलचे खेळता येणार नाहीत. तो आयपीएलमधून बाहेर पडला असून मैदानात कधी परतेल याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.
उनाडकटनंतर हा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राहुल या मोसमात लखनऊ सुपरजायंट्सचे कर्णधारपद सांभाळत होता पण आता ही जबाबदारी कृणाल पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. के एल राहुलला दुखापत झाल्यानंतर त्याला मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे तो WTC चा अंतिम सामना खेळू शकणार नाही.
पुजाराने शतकासह गाठला आणखी एक माइलस्टोन; गावस्कर, सचिन यांच्या क्लबमध्ये एन्ट्री
शार्दुल ठाकुर आणि उमेश यादव यांच्या फिटनेसबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निवड समितीला आशा आहे की मे अखेरपर्यंत हे सगळे खेळाडू फिट होऊन परत मैदानात परततील मात्र चारही खेळाडूंच्या हेल्थ अपडेटकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. चाहते खेळाडू लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.