नवी दिल्ली, 5 एप्रिल : जगातील सर्व लोकांना हवं तसं राहण्याचं, हवं तसं खाण्याचं, हवं तिथे जाण्याचं स्वातंत्र्य आहे. सर्वजण आपल्या मनासारखं आयुष्य जगू शकतात. तेही कोणत्या बंधनाशिवाय. पण असाही एक देश आहेत जिथे फार विचित्र नियम आहेत. जिथे तुम्ही तुमच्या मनाने टीव्हीदेखील पाहू शकत नाही. जगभरातील बातम्या पाहणं तर पापच आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
इथल्या लोकांना बाहेरील जगाविषयी फारशी माहिती नाही कारण ते बाहेरचे कोणतेही न्यूज चॅनल पाहू शकत नाहीत. मीडिया पूर्णपणे सरकारच्या ताब्यात आहे आणि सरकारला जे हवे आहे तेच टीव्हीवर दाखवले जाते. हा देश आहे उत्तर कोरिया. हुकूमशहा किम जोंग उनसाठी प्रसिद्ध असलेला हा देश आजकाल आपल्या विचित्र नियमांमुळे चर्चेत आहे.
उत्तर कोरियामध्ये विदेशी वाहिन्यांचे प्रसारण कोणत्याही प्रकारे पाहताना किंवा ऐकताना पकडले गेल्यास कठोर शिक्षा दिली जाते. तुरुंगातही जावे लागते. ज्या रेडिओ वाहिन्यांवर सरकार खूश नाही ते ठप्प झाले आहेत. देशाची वाईट अर्थव्यवस्था आणि दुष्काळाबाबत कोणतीही बातमी दाखवली जात नाही. वॉचडॉग रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या अहवालानुसार, येथे चीन सीमेवर वसलेली काही गावे लोकांसाठी आशेचा किरण आहेत. जिथे दक्षिण कोरियाचे टीव्ही चॅनल आहे. चित्रपटांचे रेकॉर्डिंग येथे प्रसारित केले जाते.
हेही वाचा – तोंडाला चिखल, माश्यांची शिकार; वाघाला अशा अवस्थेत पाहून नेटकऱ्यांना आली कीव, Video व्हायरल
दरम्यान, उत्तर कोरियामध्ये इंटरनेट अस्तित्वात नाही. जुलै 2022 मध्ये येथे फक्त 20,000 लोक इंटरनेट वापरत होते, जे उत्तर कोरियाच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 0.1 टक्के आहे. अजूनही 3G मोबाईल फोन सेवा आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की परदेशी लोक इथल्या लोकांशी फोनवर बोलू शकत नाहीत. इथे भीती इतकी आहे की उत्तर कोरियाचे पत्रकार जपान आणि दक्षिण कोरियाच्या वेबसाइटवर किंवा ब्लॉकवर बातम्या देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.