चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे : पुणे सातारा महामार्गावर एक भयंकर घटना समोर आली आहे. डिझेल भरण्यासाठी आलेल्या एक ट्रकने चक्क पेट्रोल पंपच उडवला आहे. ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक डिझेल पंपावर आदळला. डिझेल पंप खाली कोसळला आहे. हा भयंकर अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पुणे सातारा महामार्गावरील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या ट्रकने, डिझेल पंपला धडक देत पंप उखडला आहे. चालकाला अचानक चक्कर आल्याने, पुणे सातारा महामार्गावरच्या खेड शिवापूर हद्दीतील कोंडे देशमुख पेट्रोल पंपावर हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
पुणे सातारा महामार्गावरच्या खेड शिवापूर हद्दीतील कोंडे देशमुख पेट्रोल पंपावर प्रकार घडला. सुदैवाने जीवितहानी नाही, पेट्रोल पंपाच मात्र नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
पुण्यात एकदोन नाहीतर तर तब्बल 5300 महिला साडी नेसुन धावल्या; काय आहे प्रकरण?
पुणे सातारा महामार्गावरील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या ट्रकची, डिझेल पंपला धडक पाहा CCTV VIDEO#pune #satara #CCTV #petrolpump #marathiNews pic.twitter.com/yCWujaxlQj
— News18Lokmat (@News18lokmat) April 25, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.